राज्य सरकारकडून सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा; मान्यवर कलाकारांचा होणार सन्मान

हे पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी सरकारने सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने 2018 च्या पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस केली. त्यानुसार राज्य सरकारने हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

mantralaya mumbai | (Photo credit: archived, edited, representative image)

राज्य सरकारने (Maharashtra Government) यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची (Cultural Award 2018) घोषणा आज (7 फेब्रुवारी ) केली. या पुरस्कांची एक यादीच सरकारने जाहीर केली आहे. यात नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांचा समावेश आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

क्षेत्र, पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त मान्यवर खालीलप्रमाणे

नाटक - रवी पटवर्धन

कंठसंगी - श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक

उपशास्त्रीय संगीत - श्याम देशपांडे

मराठी चित्रपट - उषा नाईक

कीर्तन - ह.भ.प.विनोदबुवा खोंड

शाहिरी - विजय जगताप

नृत्य - माणिकबाई रेंडके

आदिवासी गिरीजन - श्रीमती वेणू बुकले

वाद्यसंगीत - पं.प्रभाकर धाकडे

तमाशा - श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे

लोककला - मोहन कदम

कलादान - श्रीकांत धोंगडे

(हेही वाचा, सुवर्णकन्या राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर; करवीरनगरीत आनंदाची लाट)

दरम्यान,  1976 पासून या पुरस्कांचे वितरण करण्यात येते. हे पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी सरकारने सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने 2018 च्या पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस केली. त्यानुसार राज्य सरकारने हे पुरस्कार जाहीर केले आहेत.