Maharashtra Bhumi Abhilekh 7/12 Utara Online: ऑनलाईन सातबारा उतारा कसा पाहाल? घ्या जाणून

सहाजिकच जमीनीचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध होऊ लागला आहे. आपणही आपला सातबारा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. कसा? घ्या जाणून.

7/12 Utara Online| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Digital Satbara Maharashtra: जमीनीचा ऑनलाईन सातबारा (Online Satbara Utara) कसा पाहावा? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोक 7x12 असेही लिहीतात. जमीनिच्या मालकीचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून या कागदपत्राला प्रचंड महत्त्व असते. ज्यावर तुम्ही मूळ जमीन मालकाचे नाव. ही जमीन, भूभाग अथवा जमिनीचा तो तुकडा कोणाच्या मालकीचा आहे. या जमीनिची किती वेळा खरेदी-विक्री झाली आहे. त्यावर कोणते कर्ज, बोजा आहे का? या सर्व गोष्टींची माहिती मिळते. जमीन खरेदी विक्री करताना हा सातबारा (7/12 Transcript Online) अतिशय महत्त्वाचा ठरतो. अर्थात अलिकडे राज्य सरकार सातबार बंद करुन त्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड किंवा ज्याला मालमत्ता प्रमाणपत्र म्हणतात ते द्यायचा प्रयत्न करते. सुरुवातीला हा सातबारा (Satbara Transcript Online) तलाठी कार्यालयातच मिळत असे. मात्र, अलिकडील काळात डिजिटल क्रांती झाल्याने सरकारी कामकाजाच्या अनेक गोष्टी ऑनलाईन पाहायला मिळतात. सहाजिकच जमीनीचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध होऊ लागला आहे. आपणही आपला सातबारा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. कसा? घ्या जाणून.

टीप: 'या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर बाबीसाठी वापरता येत नाही', अशी सूचना पाहायला मिळते. पण या सातबाराची आपण प्रिंट काढली आणि त्यावर तलाठ्याचा सही आणि शिक्का घेतला तर आपण तो सातबारा कायदशीर म्हणून वापरु शकतो. दरम्यान, अधिक माहितीसाठी आपण जवळच्या महसूल कार्यालयात जाऊ शकता तसेच गावच्या तलाठ्याकडूनही अधिक माहिती घेऊ शकता.