LPG Gas Cylinder: पेटीएम द्वारे बुकींग गेल्यास गॅस सिलिंड मिळणार मोफत

ही ऑफर केवळ एक वेळच वापरता येईल. ही ऑफर केवळ 31 जानेवारी पर्यंतच लागू आहे. बुकींग केल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकांना स्क्रॅचबॅक कार्ड ग्राहकाला मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.

Gas Cylinder Booking Paytm Offer | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तुमच्या स्वयंपाक घरात अत्यंत महत्त्वाचा असलेला गॅस सिलिंडर खूप महाग (Gas Cylinders Price) असल्याची तुमची भावना असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. सध्यास्थितीत साधारण 692 रुपयांच्या आसपास असलेला हा गॅस तुम्हाला अगदी मोफत मिळू शकतो. काय म्हणता? पटत नाही! होय, पेटीएम (PayTm) ने आपल्या ग्राहकांसाठी ही नवी ऑफर दिली आहे. या ऑफरचा लाभ घेत आपण गॅस सिलिंडर मोफत मिळवू शकता.

पेटीएमद्वारे गॅस सिलेंडर बुकींग ((LPG Cylinder Booking on Paytm)० केल्यावर आपल्याला सुमारे 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक (Cashback offer on LPG Cylinder Booking) दिला जाणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला केवळ पेटीएम अॅप डाऊनलोड करायचे आहे. या अॅपद्वारेच आपल्याला गॅस बुक करायचा आहे. ज्याद्वारे आपल्याला 700 रुपये कॅशबॅक मिळेल.

कसे मिळवाल कॅशबॅक?

कॅशबॅकची सुविधा घेण्यासाठी आपल्याला Recharge And Pay Bills ऑप्शनवर क्लिक करु Book a Cylider वर क्लिक करावे लागेल. आता आपल्याला गॅस सिलिंडरशी संबंधी सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर बुकींगपूर्वी आपल्याला कैशबैक की सुविधा का लाभ लेने के लिए आपको Recharge And Pay Bills के FIRSTLPG प्ऑरोमो कोड टाकावा लागेल. ज्यामुळे आपल्याला कॅशबँक सेवा मिळू शकेल. (हेही वाचा, Paytm च्या माध्यमातून LPG Cylinder बुकिंगवर मिळणार 500 रुपयांचा कॅशबॅक, 'या' पद्धतीने लाभ घ्या)

ऑफर कोणासाठी?

पेटीएमची ही ऑपर केवळ त्या लोकांसाठी आहे. जे लोक पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदा गॅस बुक करत आहेत. सध्यास्थितीत साधारण 14.2 किलो ग्रॅम वजनाचा एक सिलिंडर गॅस सुमारे 692 रुपयांना भेटतो आहे. जर आपण पेटीएमद्वारे गॅस बुक करत असाल तर आपल्या गॅसची संपूर्ण किंमत आपल्याला परत दिली जाईल. या ऑफरसाठी पेटीएमने काही कंपन्यांसोबत करार केला आहे.

दरम्यान, पेटीएमची ही ऑफर केवळ 500 रुपयांच्या बुकींग रकमेवर आहे. ही ऑफर केवळ एक वेळच वापरता येईल. ही ऑफर केवळ 31 जानेवारी पर्यंतच लागू आहे. बुकींग केल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकांना स्क्रॅचबॅक कार्ड ग्राहकाला मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.