Lok Sabha Election 2019: मतदार यादी नाव नोंदणी करण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी; पहा कशी ऑनलाईन नावनोंदणी

लोकसभा निवडणूका 2019 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: Getty Images)

2019 या वर्षात देशभरात निवडणूकीचे नगारे वाजणार आहेत. लोकसभा निवडणूका 2019 ची अधिकृत घोषणा झाली असून देशभरात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी तुमचे नाव मतदार यादी असणे गरजेचे आहे.  यादीत नाव नसल्यास तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे मतदान यादीत तुमचे नाव सामिल करण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी आहेत. 20 मार्चपर्यंत तुम्ही मतदान यादीत आपले नाव नोंदवू शकता.

यंदा 1.5 कोटी लोक पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. निवडणूकीच्या दृष्टीने इतकी मते अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे निवडणूकांपूर्वी मतदान यादीत नाव नोंदवणे गरजेचे आहे. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान देशभरात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 मे रोजी पार पडणार आहे.

तुम्ही घरबसल्या वोटर्स आयडी बनवू शकता किंवा वोटर्स आयडीत काही चुका असल्यास त्या ऑनलाईन दुरुस्त करु शकता. यासाठी निवडणूक आयोगाच्या साईट वर जाऊन आपली माहिती भरावी. यासाठी निवडणूक आयोगाने एक अॅप्लीकेशन सुरु केले होते. हे अॅप नव्या रजिस्ट्रेशनसाठी एसएमएस द्वारा अलर्ट पाठवेल.

मतदान यादीत नाव कसे नोंदवाल?

मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.nvsp.in/ वर जा आणि ऑनलाईन नाव नोंदणी करा. तुमच्या अॅप्लिकेशनचे स्टेटस तुम्ही ऑनलाईन चेक करु शकता. अॅप्लिकेशन केल्यानंतर महिन्याभराच्या आत तुम्हाला वोटर्स आयटी मिळेल.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

ओळखपत्र- जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड यापैकी एक.

अॅड्रेस प्रुफ- रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, फोन किंवा वीज-पाणी बिल.