Lok Sabha Elections 2019 या निवडणुकीत मतदार यादीत नाव, पत्ता नोंदवण्यासाठी 1950 या हेल्पलाईन नंबरची मदत कशी घ्याल?

या समस्यांचे, प्रश्नांचे निवारण करण्यासाठी निवडणूक आयोगाने खास हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर देशभरात निवडणूकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. देशात सात आणि राज्यात चार टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. 11 एप्रिल ते 19 मे या दरम्यान निवडणूका होणार असून 23 मे रोजी निवडणूकांचे निकाल लागणार आहेत.

मात्र नव्याने मतदान करणाऱ्या किंवा जुन्या मतदारांच्याही अनेक समस्या असतात. या समस्यांचे, प्रश्नांचे निवारण करण्यासाठी निवडणूक आयोगाने खास हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. 1950 असा हा नंबर असून या नंबरवरुन तुम्हाला आवश्यक ती माहिती अगदी सहज उपलब्ध होईल.

या नंबरद्वारे मतदार त्यांची खाजगी माहिती, मतदान केंद्र आणि इतर माहिती मिळवू शकतात. हीच माहिती तुम्हाला मतदार हेल्पलाईन मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे मिळू शकते किंवा www.nvsp.in या बेसाईटला भेट देऊनही तुम्ही आवश्यक ती माहिती मिळवू शकता.

फ्री एसएमएस सेवेच्या माध्यमातून माहिती कशी मिळवाल?

1950 या नंबरवर फ्री एसएमएस पाठवून मतदार आवश्यक ती माहिती मिळवू शकतात.

त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

१) ECI <EPIC Number> <0 (इंग्रजीमध्ये रिप्लाय मिळवण्यासाठी किंवा ECI <EPIC Number> <1 (प्रादेशिक भाषेत माहिती मिळवण्यासाठी)

२) ECIPS <EPIC Number>

तुमच्या ईपीआयसी क्रमांक नुसार तुमच्या मतदान केंद्राचा पत्ता यावरुन तुम्हाला उपलब्ध होईल.

३) ECICONTACT <EPIC Number>

असा एसएमएस पाठवल्यानंतर तुम्हाला बुथ लेव्हलच्या ऑफिसर्स, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संपर्क तपशील उपलब्ध होईल.

मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादी समाविष्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मतदार यादी तुमचे नाव आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी देखील तुम्हाला फ्री एसएमएस सर्व्हिसचा लाभ घेता येईल.

मतदार यादी नाव कसे नोंदवाल?

# मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही www.nvsp.in या वेबसाईटवरुन Form 6 भरुन समिट करा. किंवा फॉर्म समिट करण्यासाठी तुम्हाला मोबाईल अॅपचा वापर करता येईल.

# फॉर्ममध्ये काही चुका दुरुस्त करायच्या असल्यास तुम्ही फॉर्म 8 ऑनलाईन NVSP या बेवसाईट किंवा मोबाईल अॅपवरुन करु शकता.

# पत्त्यामध्ये काही दुरुस्ती किंवा सुधारणा करायची असल्यास तुम्ही फॉर्म 8A भरु शकता.

हेल्पलाईनची खासियत

# निवडणूक आणि मतदानासंबंधित माहिती देणे.

# नवीन मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करणे.

# मतदान ओळपत्रातील बदल यासंदर्भात माहिती देणे.

# मतदान यादी नाव कसे नोंदवावे याबाबत माहिती देणे.

# मतदान ओळखपत्र आणि मतदार अर्ज याबाबत माहिती उपलब्ध.

# इंग्रजीसह प्रादेशिक भाषेत माहिती उपलब्ध.

# निवडणूक संदर्भातील तक्रार नोंदवण्यासाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध.

ही हेल्पलाईन सर्व जिल्ह्यात 24 तास सुरु राहणार असून याद्वारे मतदारांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येईल.