LIC Kanyadan Policy: महिन्याला 3600 च्या प्रिमियम वर 25 वर्षांनी 27 लाख देणारी एलआयसी कन्यादान पॉलिसी पहा काय?
ही सूट अधिकच्या दीड लाखांवर आहे. यासोबतच सेक्शन 10 ( 10 D) अंतर्गत मॅच्युरिटी किंवा मृत्यू क्लेम वर देखील सूट दिली जाते.
मुलगी ही परक्याचं धन असतं. आजही ग्रामीण भागांमध्ये मुलगी नकोशी असते कारण विशिष्ट वयानंतर तिचं लग्न, हुंडा या रूढी परंपरांचा फेरा असतो आणि यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण असते. आज ग्रामीण असो किंवा शहरी मुलीचं लग्न म्हणजे आयत्यावेळेस मोठी आर्थिक रक्कम गोळा करणं अनेकांना शक्य नसतं. म्हणूनच मुलीच्या जन्मापासूनच तिच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून एलआयसीने LIC Kanyadan Policy बाजारात आणली आहे. या मध्ये महिन्याला 3600 रूपयांच्या प्रिमियम वर 25 वर्षांनी तुम्हांला 27 लाख मिळू शकतात.
काय आहे LIC Kanyadan Policy?
LIC Kanyadan Policy मध्ये रोज 121 रूपयांची बचत करून महिन्याला 3600 रूपयांचा प्रिमियम तुम्ही नियमित 22 वर्ष भरल्यानंतर 25 वर्षांनी तुम्हांला 27 लाख रूपये मिळू शकतात. यासाठी पॉलिसी धारकाचं किमान वय 30 वर्ष असणं आवश्यक आहे तर मुलीचं वय 1 वर्ष असणं आवश्यक आहे. यामध्ये पॉलिसी काढल्यानंतर तुमचा मृत्यू झाल्यास पॉलिसीचा प्रिमियम भरावा लागत नाही. वार्षिक 1 लाख रूपये मिळतात. तर 25 वर्षांनी 27 लाख रूपये मिळतात. तसेच प्रिमियम कमी-जास्त करण्याची सोय आहे. पॉलिसी जरी 25 वर्षांची असली तरीही प्रिमियम हा केवळ 22 वर्ष भरायचा आहे.
दरम्यान तुमच्या या एलआयसी कन्यादान पॉलिसीच्या मार्फत इन्कम टॅक्स मध्ये सेक्शन 80C मध्ये प्रिमियम मध्ये सूट दिली जात. ही सूट अधिकच्या दीड लाखांवर आहे. यासोबतच सेक्शन 10 ( 10 D) अंतर्गत मॅच्युरिटी किंवा मृत्यू क्लेम वर देखील सूट दिली जाते.
तुम्हांला ही पॉलिसी थेट एलआयसीच्या वेबसाईटवरून किंवा एलआयसी एजेंट कडून घेतली जाऊ शकते. तुम्हांला ही पॉलिसी थेट एलआयसीच्या वेबसाईटवरून किंवा एलआयसी एजेंट कडून घेतली जाऊ शकते.