LIC Jeevan Utsav Plan: एलआयसी 'जीवन उत्सव' प्लान फिचर्स, गुंतणूक आणि बचत

LIC Jeevan Utsav Features: आर्थिक बचत आणि गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एलआयसी एक नवी योजना (Insurance Scheme) घेऊन येत आहे. ही योजना (LIC New Scheme) उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

LIC (Photo Credits: Twitter)

LIC Jeevan Utsav Features: आर्थिक बचत आणि गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एलआयसी एक नवी योजना (Insurance Scheme) घेऊन येत आहे. ही योजना (LIC New Scheme) उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. या योजनेमध्ये लहान-थोर आणि सामाजातील प्रत्येक घटकाला गुंतवणूक करता येणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जीवन उत्सव' (Jeevan Utsav) असे या योजनेचे नाव असल्याचे समजते. जाणून घ्या या नव्या कोऱ्या योजनेची वैशिष्ट्ये. इथे दिलेली माहिती प्राप्त महितीच्या आधारावर आहे. अधिक माहितीसाठी एलआसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

'जीवन उत्सव' योजनेची वैशिष्ट्ये

आठरा वर्षे पूर्ण असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस एलआयसी 'जीवन उत्सव' योजनेचा हमीसह लाभ घेता येईल. नियमीत अथवा तात्पूरत्या (फ्लेक्सी) लाभ निवडण्याचा पर्यायही उपलब्ध. पॉलिसीच्या सुरुवातीस सर्वांनाच ही हमी देण्यात येईल. पॉलीसी सुरु असेपर्यंत संपूर्ण कालावधीसाठी विमा सेवा उपलब्ध. 40 रुपये प्रति हजार दराने गॅरेंटेड बोनस प्रीमियम केवळ पॉलिसी कालावधीपर्यंतच. 5.5% प्रति वर्ष आकर्षक दराने गुंतवणूक, स्थगिती आणि पर्याय निवडण्याची मुभा. वार्षिक चक्रवाढीने परतावा. हप्त्याचा अवधी पाच ते सोळा वर्षांचा असेल. 90 दविसांचे बाळ ते 65 वर्षांवरील व्यक्तीसही योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. ही योजना जवळपास सर्व वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आहे. (हेही वाचा, LIC Front Running Case: 'एलआयसी फ्रंट रनिंग' प्रकरणी पाच संस्था प्रतिबंधित; सेबीचे आदेश)

'जीवन उत्सव' योजनेसाठी पात्रता व अटी

  • प्रीमियम भरण्याचा अवधी: 5 ते 16 वर्षे
  • कमाल आणि किमान वयोमर्यादा: किमान- जन्मापासून 90 दिवस पूर्ण, कमाल- जन्मतारखेपासून 65 वर्षांपर्यंत
  • कमाल प्रीमियम समाप्ती वर्षे- जन्मतारखेपासून जवळपास 75 वर्षे
  • उत्पन्न लाभ प्रारंभासाठी किमान वर्षे- 18 वर्षे पूर्ण
  • मूळ विमाधन- किमान- 5,00,000 रुपयांपासून सुरु, कमाल- कोणतीही मर्यादा नाही

LIC जीवन उत्सवामध्ये प्रवेशासाठी किमान आणि कमाल वय निश्चित केलेल्या आयुर्मानानुसार बदलते. जीवन उत्सव योजनेला कमाल विमा रकमेची मर्यादा नसली तरी, ती भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंडररायटिंग पॉलिसीवर आधारित असेल. मूळ विमा रक्कम रु. 25000 च्या पटीत 24 लाखांपर्यंत वाढविली जाऊ शकते. प्रवेशाच्या वेळी विमा उतरवलेल्या व्यक्तीचे वय, प्रवेशाच्या वेळी किमान वय वगळून वय जवळचा वाढदिवस (NBD) म्हणून घेतले जाईल. अधिक माहितसाठी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

LIC म्हणजे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही सरकारी मालकीची विमा आणि गुंतवणूक कंपनी आहे. भारतीय जीवन विमा कायद्याने विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर 1956 मध्ये LIC ची स्थापना झाली. LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आणि संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. मार्च 2023 पर्यंत, LIC कडे व्यवस्थापनाखालील मालमत्ता ₹ 45.7 ट्रिलियन (US$570 अब्ज) होती. LIC अनेक कव्हर पर्याय आणि कर लाभांसह जीवन विमा योजना आणि पॉलिसी ऑफर करते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now