LIC IPO: एलआयसी आयपीओ घ्यायचा विचार करताय? ही माहिती आपल्यासाठी ठरु शकते फायदेशीर

त्याबाबत मोठ्या प्रमामावर जाहीरातीही सुरु आहेत. मात्र, एलआयसी (LIC) आयपीओ यंदाच्या वर्षी तरी येण्याची शक्यता बरीचशी कमी असल्याचे वृत्त आहे. एलआयसीही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.

LIC | (File Photo)

एलआयसी आयपीओ (LIC IPO) बाजारात येणार त्यासाठी अनेक गुंतवणूकदार डोळे लावून बसले आहेत. त्याबाबत मोठ्या प्रमामावर जाहीरातीही सुरु आहेत. मात्र, एलआयसी (LIC) आयपीओ यंदाच्या वर्षी तरी येण्याची शक्यता बरीचशी कमी असल्याचे वृत्त आहे. एलआयसीही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात एलआयसी आयपीओ आणण्याची शक्यात बरीचशी कमी असल्याचे अभ्यासक सांगत आहे. रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War), कोरोना महामारीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेले परीणाम. त्याचे भारतीय शेअर मार्केटमध्ये उमटलेले पडसाद यांसारख्या विविध गोष्टींचा विचार करता एलआयसी आयपीओ बाजारात आणणे पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.

एलआयसी आयपीओबाबत एनडीटीव्ही इंडियाने वृत्त दिले आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात यंदाच्या वर्षी तरी एलआयसी आयपीओ बाजारात येण्याची शक्यता बरीचशी कमी असल्याचे म्हटले आहे. सेबीला कोणतेही कागदपत्र दाखल न करता एलआयसी आयपीओ बाजारात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रीलच्या सुरुवातीपर्यंत तरी एलआयसी लिस्टींगची कोणतीच शक्यता दिसत नाही. कारण रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा, LIC PAN Card Link for IPO: एलआईसी आईपीओसाठी तुमच्या पॉलिसी खात्याशी अपडेट करा पॅन कार्ड! अन्यथा करावा लागेल पश्चाताप)

सेबीने एलआयसीने 13 फेब्रुवारी 2022 ला दाखल केलेल्या दस्तऐवजातील मसुद्याला (डीआरएचपी) सेबीने मान्यता दिली आहे. त्यामुले या शेअरचा रस्ता मोकळा आहे. सरकारने एलआयसीमध्ये जवळपास 31.6 कोटी शेअर्स म्हणजेच 5% समभाग विकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत 60,000 कोटी रुपये येतील असा अंदाज आहे.

एलआयसीने सेबीला दिलेल्या कागदपत्रांनुसार आंतरराष्ट्रीय मुल्यांकन कंपनी मिलीमॅन एडवाइजर्स द्वार एलआयसीचे अंतर्गत मुल्य काढण्यात आले आहे. 30 डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीचे अंतरीक मुल्य 5.4 लाख कोटी रुपये इतके होते. अंतर्गत मूल्य विमा कंपनीमध्ये समभागधारकांचे एकीकृत मूल्याच्या आधारे हे मुल्य काढण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif