रेल्वेची Waiting List मध्ये असलेली किती तिकिटं खरंच कंफर्म होऊ शकतात? पहा रेल्वे ने सांगितलेला मॅजिक फॉर्म्युला!
ट्रेन मध्ये जर 10 स्लीपर कोच असतील आणि प्रत्येकामध्ये 18 सीट्स उपलब्ध होत असतील तर संपूर्ण ट्रेन मध्ये 180 सीट्स कंफर्म होतात.
सुट्ट्यांचा काळ सुरू झाला की अनेजण फिरायला बाहेर पडतात. अनेकदा रेल्वेच्या वेटिंग लिस्टचा आकडा पाहून हा प्लॅन गुंडाळून ठेवतात. जर रेल्वेचं तिकीट वेटिंग वर असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रवाशांच्या मनात धाकधूक असते. नोकरदारांना हे टेंशन अधिक असतं कारण त्यांना मिळालेल्या रजेमध्येच हा व्हेकेशनचा देखील प्लॅन बसवायचा असतो. त्यामुळे किती वेटिंग लिस्टची तिकीट कंफर्म होतील याची खात्री अनेकांना नसरे, काही वेबसाईट्स आता तिकीट कन्फर्म होण्याचा अंदाज व्यक्त करतात. पण आता हे टेंशन थोडं कमी करण्यासाठी रेल्वेनेच ही वेटिंगची तिकीट कंफर्म कशी होतात याचा फॉर्म्युला सांगितला आहे.
सणासुदीच्या काळात तिकीटांसाठी मोठी गर्दी
देशभर सणासुदीच्या काळात सुट्ट्या असल्याने अनेक जण रेल्वे प्रवास करतात. अनेकदा या काळात वेटिंग लिस्ट 500 पर्यंत पोहचल्याचं पहायला मिळालं आहे. अशा गर्दीच्या वेळी तिकीट कंफर्म होण्याची शक्यता देखील कमी होत असते. दरम्यान वेटिंग लिस्ट वरील तिकीट दोन मार्गांनी कंफर्म होत असतात. यामध्ये एक नॉर्मल कॅन्सरलेशन म्हणजे रद्द झालेल्या तिकीटांविरूद्ध वेटिंग वरील तिकीटं कन्फर्म होतात तर दुसरा मार्ग हा इमरजंसी कोटा असतो.
सरासरी तिकीट कॅन्सलेशन दर किती असतो?
सरासरी 21% प्रवासी त्यांची तिकीटं रिझर्व्हेशन नंतर रद्द करतात. त्यामुळे सहाजिकच या 21% ने वेटिंग वरील तिकीटं कंफर्म होतात. जर स्लीपर कोच मध्ये 72 सीट्स असतील तर 14 सीट्स उपलब्ध होऊ शकतात. तसेच 4-5% प्रवासी असेही असतात जे तिकीटं खरेदी करतात पण प्रवास करत नाहीत. त्यामुळे त्यांचाही विचार केला तर कंफर्मेशनची शक्यता 25% पर्यंत पोहचते म्हणजे स्लीपर कोच मध्ये 18 सीट्स कंफर्म होण्याचा अंदाज असतो. IRCTC Super App: आयआरसीटीसी चं नवं अॅप झालं लॉन्च; आता तिकीट बुकिंग सह अन्य सुविधा देखील होणार उपलब्ध.
ट्रेन मध्ये सीट्स कंफर्म किती होतात?
ट्रेन मध्ये जर 10 स्लीपर कोच असतील आणि प्रत्येकामध्ये 18 सीट्स उपलब्ध होत असतील तर संपूर्ण ट्रेन मध्ये 180 सीट्स कंफर्म होतात. हाच फॉर्म्युला ट्रेन मधील थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी कोच साठी देखील लागू होत असतो.
Emergency Quota मधून तिकिटांचे अधिकचे कंफर्मेशन
रेल्वे मंत्रालयाकडून Emergency Quota म्हणून 10% तिकीटं ठेवली जातात. ही तिकीतं अत्यंत आजारी किंवा गरजूंना दिली जातात. त्यासाठी 5% तिकीटं वापरली जातात आणि उरलेली 5% तिकीटं ही उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे प्रवासाच्या तारखेपर्यंत तिकीटं कंफर्म होतात.