जम्मू-काश्मीर: अनंतनाग येथे दहशतवादी हल्ला; CRPF चे 5 जवान शहीद, एक दहशतवादी ठार
या हल्ल्यात सीआरपीएफ (CRPF) पोलीस दलातील पाच जवान शहीद झाले. तर, चार कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाला. जवानांवर गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावर अतिरिक्त दलाची कुमक पाठविण्यात आली आहे.
श्रीनगर: जम्मू - काश्मीर (Jammu And Kashmir)येथील अनंतनाग (Anantnag)परिसरात बुधवारी (12 जून 2019) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफ (CRPF) पोलीस दलातील पाच जवान शहीद झाले. तर, चार कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाला. जवानांवर गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावर अतिरिक्त दलाची कुमक पाठविण्यात आली आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनंतनाग येथील केपी रोड बस स्टॅंड जवळ दहशतवाद्यांनी सीआरपीएफ (CRPF) जवानांवर हल्ला केला. त्यानंतर दहशतवादी आणि पोलिस यांच्याज जोरदार गोळीबार सुरु झाला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कारमध्ये बुरखा परिधान करुन आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
जम्मू काश्मीर येथील सोपोर येथे बुधवारी झालेल्या गोळीबारात जवानांनी एका दहशतवाद्याला यमसदनी धाडलं. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी सोपोर येथील वदुरा पईन गावात शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, मारण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नाही. (हेही वाचा, भारतीय वायुदलाच्या बेपत्ता IAF AN-32 विमानाचे अवशेष सापडले)
एएनआय ट्विट
दरम्यान, जम्मू काश्मीर येथी पुंछ परिसरात पाकिस्तानकडून सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या वेळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद तर एक जखमी झाला होता. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले होते.