Gold and Silver Prices Today: जन्माष्टमीच्या दिवशी सोने-चांदी स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या आज काय आहे 1 तोळा सोन्याचा दर

येथे आम्ही तुम्हाला सोने आणि चांदीच्या अपडेटेड किंमती सांगणार आहोत.

Gold and Silver (फोटो सौजन्य - Pixabay)

Gold and Silver Prices Today: आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी सोन्या-चांदीच्या दरात (Gold and Silver Rate) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे, तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी आज देशातील विविध शहरांमध्ये सोन्या-चांदीची विक्री कोणत्या किमतीला होत आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. येथे आम्ही तुम्हाला सोने आणि चांदीच्या अपडेटेड किंमती सांगणार आहोत.

दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव -

MCX वर आज सोन्याच्या चांदीच्या किमती

26 ऑगस्ट 2024 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली. 4 ऑक्टोबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 423 रुपये किंवा 0.59 टक्क्यांनी वाढून 72200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. (हेही वाचा - (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)

त्याच वेळी, चांदीच्या किमतीत देखील आज वाढ नोंदवली गेली. चांदीचा दर 86120 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. यापूर्वी चांदीचा भाव 85211 रुपये प्रति किलो होता.