IRCTC Tatkal Train Ticket: रेल्वे तात्काळ तिकीट बुकींगच्या बदललेल्या वेळा आणि नियम
IRCTC च्या www.irctc.co.in या वेबासाईटवरुन तुम्ही तात्काळ तिकीट बुक करु शकता.
भारतीय रेल्वे (IRCTC) तात्काळ तिकीट बुकींगची ऑनलाईन सेवा प्रदान करते. त्यामुळे IRCTC च्या www.irctc.co.in या वेबासाईटवरुन तुम्ही तात्काळ तिकीट बुक करु शकता. होळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तिकीट बुकींगसाठी एकच धांदल उडाली आहे. या काळात तात्काळ तिकीटांची उपलब्धता कमी असते.
IRCTC नुसार, तात्काळ तिकीट बुकींगचा अवधी दोन दिवसांवरुन एक दिवस करण्यात आला आहे. म्हणजे ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी तुम्ही तात्काळ तिकीट बुक करु शकता. एसी क्लास (2 ए, 3 ए, सीसी, 3ई) साठी तात्काळ तिकीट विंडो सकाळी 10 वाजता उघडेल. एसी क्लास (एसएल, एफसी, 2 एस) साठी तात्काळ तिकीट विंडो सकाळी 11 वाजता उघडेल.
# एका तात्काळ तिकीटाच्या PNR नंबरवर जास्तीत जास्त चार प्रवासांचे तिकीट बुक करु शकता.
# भारतीय रेल्वे महिला आणि सामान्य कोटासोबत तात्काळ कोटा आणि ट्रेन तिकीट घेण्याचे अनुमती देत नाही. फर्स्ट एसी आणि एग्झीक्युटीव्ह क्लासचे तिकीट बुक करता येत नाही.
# भारतीय रेल्वे तात्काळ तिकीट अंतर्गत स्लीपर क्लासच्या ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी कमीत कमी 100 रुपये आणि अधिकाधिक 200 रुपये मोजावे लागतील.
# एसी चेअर कार तिकीटासाठी भारतीय रेल्वेने 125-225 रुपये शुल्क आकारले आहेत. कन्फर्म तात्काळ ट्रेन तिकीट कॅन्सल करण्यासाठी कोणतेही रिफंड देण्यात येणार नाही.
# IRCTC नुसार अचानक तिकीट कॅन्सलेशन आणि वेटलिस्टेड तिकीट कॅन्सल केल्यावर भारतीय रेल्वे नियमांनुसार शुल्क परत दिले जातील.