IRCTC Recruitment 2022: भारतीय रेल्वे मध्ये HRD Joint General Manager पदासाठी नोकरभरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज?
नोकरभरती मध्ये अर्ज करणार्यांची भरती ही Personnel Department of Railways मध्ये "A" किंवा “B” पदावरील ऑफिसर अशी होणार आहे.
IRCTC कडून Joint General Manager/Deputy General Manager, HRD पदासाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरभरतीसाठी तुम्हांला irctc.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत आपला अर्ज विहित स्वरूपात सादर करावा लागणार आहे. या नोकरभरती मध्ये अर्ज करणार्यांची भरती ही Personnel Department of Railways मध्ये "A" किंवा “B” पदावरील ऑफिसर अशी होणार आहे. हे देखील नक्की वाचा: SBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6681 PO आणि लिपिक पदांसाठी भरती; पात्रता, अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या.
IRCTC Recruitment 2022 साठी कसा कराल अर्ज?
नवी दिल्लीच्या आयआरसीटीसी च्या कार्यालयामध्ये उमेदवारांना व्हिजिलंस हिस्ट्री, डी अॅन्ड एआर क्लिअरन्स आणि मागील 3 वर्षांच एपीआर द्यावे लागणार आहेत.
इमेल द्वारा deputation@irctc.com वर उमेदवाराला अर्जाची स्कॅन कॉपी सादर करावी लागणार आहे.
सोबतच अर्जाला तुमचा पासपोर्ट फोटो देखील लावावा लागणार आहे.
अर्जदाराची आयुमर्यादा काय असावी?
अर्जदाराची आयुमर्यादा 55 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
वेतन मर्यादा काय असेल?
उमेदवाराला Rs. 15,600 ते Rs. 39,100 दरमहा पगार दिला जाई. यामध्ये
सहाव्या वेतन आयोगानुसार, Grand Pay 6600/5400 (Level – 10/11) असणार आहे.
आयआरसीटीसी ही देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलिटी आणि कॅटरिंग कंपनींपैकी एक आहे. तिची स्थापना 27 सप्टेंबर 1999 ला झाली.