Train Ticket Discount: आजारी रुग्णांसह नातेवाईकांना मिळणार तिकीटाच्या दरात विशेष सवलत, जाणून घ्या कसे
रेल्वेच्या नियमामध्ये तुमच्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्यांना तिकीटाच्या दरात विशेष सूट मिळणार आहे.
भारतीय रेल्वे विभाग (Indian Rilway) हा प्रवाशांचा प्रवास हा अधिक सोप्पा आणि सुखकर होण्यासाठी नेहमीच अनेक योजना या राबवत असतो. रेल्वे विभागांकडून अनेक रेल्वेच्या टिकीटांमध्ये सुट या देत असतात. तसेच रेल्वे अनेक प्रकारच्या सोयी सुविधाही पुरवते. यामध्ये सीनियर सिटीजन आणि दिव्यांग व्यक्तींना रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये सूट देत असते. भारतीय रेल्वे प्रवाशांना प्रवासात चांगल्या सुविधा पुरवत असते. फर्स्ट एसी ते जनरल डब्यापर्यंत प्रत्येक वर्ग आपापल्या परीने प्रवास करू शकतो. यासोबतच काही विशेष गरजूंनाही रेल्वे भाड्यात सूट देण्यात आली आहे.
जेष्ठ नागरिकच नाही तर रेल्वेच्या नियमांनुसार काही आजारांच्या रुग्णांसाठी रेल्वे भाड्यात सूट देण्याची तरतूद आहे. रेल्वेच्या नियमामध्ये तुमच्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्यांना तिकीटाच्या दरात विशेष सूट मिळणार आहे. यामध्ये रेल्वेने कोणते आजार कव्हर केले आहेत व भाड्यात किती सूट मिळू शकते.
कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला भाडे माफ होऊ शकते. अशा परिस्थितीत, रुग्णाला फर्स्ट एसी कार, फर्स्ट क्लास, सेकंड क्लासमध्ये 75% सूट मिळते. याशिवाय स्लीपर आणि एसी-3 टियरमध्ये 100 टक्के सूट आहे. फर्स्ट एसी आणि एसी-2 टियरमध्ये 50% सूट उपलब्ध आहे. बस अटेंडंटना स्लीपर आणि AC-3 सीटवर 75 टक्के सूट मिळते. थॅलेसेमियाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत प्रवास (Travel) करणाऱ्यांना सूट मिळते. याशिवाय हार्टचे ऑपरेशनसाठी जाणारा रुग्ण व नातेवाईक, इतर ऑपरेशन व डायलिसिसाठी जाणारे मूत्रपिंड रुग्ण यांनाही सूट मिळते. या रुग्णांना सेकंड, स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कार, फर्स्ट आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सवलत मिळते.