Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांच्या वेतनाप्रमाणे बोनस जाहीर; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आणखी गोड होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य प्रमाणात उत्पादकता-लिंक्ड बोनस (Productivity-Linked Bonus) देण्याचा निर्णय घेतला आहे

Money | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: pixabay)

भारतीय रेल्वे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूश खबर आहे. या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आणखी गोड होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य प्रमाणात उत्पादकता-लिंक्ड बोनस (Productivity-Linked Bonus) देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मंजूरी देण्यात आली. प्राप्त माहितीनुसाह, दिला जाणारा हा बोनस आर्थिक वर्ष 2021-2022 या वर्षासाठी असेल. तसेच, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी RPF/RPSF कर्मचारी वगळून अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे 11.27 लाख नॉन-राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना 78 दिवसांचे PLB देण्यासाटी 1,832.09 कोटी रुपयांची रक्कम लागणार असल्याचा आर्थिक असल्‍याचा अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार, PLB भरण्यासाठी विहित केलेली वेतन गणनेची कमाल मर्यादा प्रति महिना 7,000 रुपये आहे. तर, 78 दिवसांसाठी प्रति पात्र रेल्वे कर्मचारी देय असलेली कमाल रक्कम 17,951 रुपये इतकी आहे.

रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी म्हटले होते की, रेल्वे कर्मचारी प्रवासी आणि वस्तू सेवांच्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. जी अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक म्हणूनही काम करतात. त्यामुळे त्यांच्या या कामाचे आणि गुणांचे कौतुक व्हायला हवे. त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे.