SBI FD Interest Rate Hikes: एसबीआय ने करोडो ग्राहकांना दिली खुशखबर! काय आहे खास ऑफर जाणून घ्या सविस्तर
आता तुम्हाला यावर जास्त व्याज मिळणार आहे.
SBI FD Interest Rate Hikes: खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्याजदरात (SBI FD Interest Rate Hikes) वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, बँकेने 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या रु. 2 कोटी पेक्षा कमी FD चे व्याजदर 10 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. या FD वर आता 15 जानेवारी 2022 पासून 5.1% (5% वरून वाढलेले) व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना FD वर 5.6% (5.5% च्या वर) व्याज दर मिळेल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला SBI मध्ये 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीची FD उघडायची असेल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला यावर जास्त व्याज मिळणार आहे. नवीन व्याजदर 15 जानेवारी 2022 पासून लागू झाला आहे. यापूर्वी 8 जानेवारी 2021 रोजी FD चे नवीन व्याजदर लागू करण्यात आले होते. जुने व्याजदर 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीतील FD वगळता इतर सर्व FD वर लागू आहेत. (वाचा - EPFO Cash Withdrawal: खुशखबर! आता PF खातेधारक गरज पडल्यास काढू शकतात 1 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
SBI FD व्याज दर
7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.90 टक्के, 46 ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.90 टक्के, 180 ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.40 टक्के, 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.40 टक्के, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.1 टक्के (वाढीव), 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.1 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या FD वर 5.3 टक्के आणि 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या FD वर 5.4 टक्के व्याज मिळणार आहे.
त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर अनुक्रमे 3.4 टक्के, 4.4 टक्के, 4.9 टक्के, 5.6 टक्के (वाढीव), 5.6 टक्के, 5.8 टक्के आणि 6.2 टक्के आहे. याआधी, अलीकडेच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनेही आपल्या निश्चित कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती.