Income Tax Return 2020-21 फाईल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर येतेय जवळ पहा डेडलाईन पूर्वी कसा भराल आयटीआर

नुकतीच 2020-21 चा आयटीआर भरलेल्यांना ई व्हेरिफिकेशन साठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: PTI)

यंदाचा 2020-21 चा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी डेडलाईन आता जवळ येत आहे. 31 डिसेंबर ला Assessment Year 2021-22 चा आयटीआर भरण्याची अंतिम मुदत आहे.जसजशी अंतिम मुदत जवळ येते तशी फॉर्म न भरणार्‍यांना धास्ती वाटणं सहाजिक आहे. काल ट्वीटर वर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर ग्लिच असल्याने अनेकांनी अंतिम मुदत वाढवण्यासाठी मागणी केली आहे. सरकारकडून मात्र वारंवार अंतिम मुदतीपर्यंत न थांबता वेळीच आयटीआर फाईल करा म्हणजे आयत्या वेळेस वेबसाईटवर येणार्‍या ताणामुळे भुर्दंड बसणं टाळता येऊ शकतं असं सांगितलं जातं. त्याबाबतचे हॅशटॅग देखील ट्रेंड होत होते.  नक्की वाचा: नोकरदार लोकांसाठी या आहेत '6' Tax Saving Investments,इन्कम टॅक्स वाचवायला होईल मदत.

ऑनलाईन इन्कम टॅक्स कसा फाईल करायचा?

इन्कम टॅक्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार संध्याकाळ पर्यंत 5 कोटी लोकांचे आयटीआर भरून झाले आहेत. नुकतीच 2020-21 चा आयटीआर भरलेल्यांना ई  व्हेरिफिकेशन साठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.