IMPS new rule from Feb 1: आता Beneficiary Details न भरता 5 लाखांपर्यंत पैसे करू शकाल ट्रान्सफर; पहा कशी असेल प्रक्रिया!

या नव्या अपडेट मुळे युजर्सना आता प्रत्येक वेळी व्यवहारासाठी समोरच्या व्यक्तीचे बॅंक डिटेल्स घेऊन त्याला बेनिफिशरी मध्ये समाविष्ट करून घेण्याची किचकट प्रक्रिया टाळता येणार आहे.

Online | Pixabay.com

National Payments Corporation of India च्या परिपत्रकानुसार, आता ऑनलाईन बॅकिंगचे युजर्स पैसे स्वीकारणार्‍याचे तपशील जसे की मोबाइल नंबर, बँक खाते नावे, खाते क्रमांक किंवा IFSC कोड न टाकता IMPS वापरून 5 लाखांपर्यंतचा ऑनलाईन व्यवहार करू शकणार आहेत. MMID हा मोबाईल बँकिंग प्रवेशासाठी बँकांद्वारे जारी केलेला सात-अंकी क्रमांक आहे. याद्वारा एका व्यक्ती कडून दुसर्‍या व्यक्तीकडील आर्थिक व्यवहार सुव्यवस्थित केला जातो. यासाठी आता फक्त जो व्यक्ती पैसे स्वीकारणार आहे त्याचा मोबाइल नंबर आणि MMID आवश्यक आहे.

IMPS, या 24x7 झटपट देशांतर्गत निधी हस्तांतरण प्रणालीची भारताचं आर्थिक लॅन्डस्केप बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हे अचूकता आणि गती दोन्ही सुनिश्चित करून, बँकांमधून पैशांची देवाण घेवाण करते. या नव्या अपडेट मुळे युजर्सना आता प्रत्येक वेळी व्यवहारासाठी समोरच्या व्यक्तीचे बॅंक डिटेल्स घेऊन त्याला बेनिफिशरी मध्ये समाविष्ट करून घेण्याची किचकट प्रक्रिया टाळता येणार आहे. New Rules From 1st February 2024: 1 फेब्रुवारीपासून बदलणार 'हे' 6 नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम .

IMPS प्रक्रियेद्वारा कसा कराल आर्थिक व्यवहार?

Step 1: मोबाईल बॅकिंग अ‍ॅप ओपन करा.

Step 2: 'Fund Transfer'च्या सेक्शन मध्ये जा.

Step 3: 'IMPS'चा पर्याय आर्थि व्यवहारासाठी निवडा.

Step 4: आता पैसे ज्याला द्यायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर टाका. आणि beneficiary bank name निवडा. आता अकाऊंट नंबर किंवा IFSC कोड टाकण्याची गरज नाही.

Step 5: 5 लाखापर्यंत तुम्हांला जी रक्कम ट्रान्सफर करायची आहे ती निवडा.

Step 6: आवश्यक तपशील टाकल्यानंतर 'Confirm' चा पर्याय निवडा व्यवहार पूर्ण करा.

Step 7: आता OTP च्या माध्यमातून तुमचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

जसं तंत्रज्ञान प्रयत्न होत आहे तसा ऑनलाईन व्यवहारांकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. पण यामध्ये ऑनलाईन माध्यमातून फ्रॉड, फसवणूकीचा देखील धोका वाढत आहे त्यामुळे हे व्यवहार सांभाळून करण्यातच हित आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now