1 नोव्हेंबरपासून सार्वजनिक बँकांमध्ये होणार हे महत्वपूर्ण बदल, जाणून घ्या सविस्तर

या बदलांमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल, तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचे व्याजदर बदलणार आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

मोदी सरकार आल्या नंतर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला देशभरात नवनवीन बदल होतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मग हा बदल आर्थिक क्षेत्रात असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या 1 नोव्हेंबरपासून देशभरात नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल, तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचे व्याजदर बदलणार आहेत.

एसबीआय ने या आधी 9 ऑक्टोबरला घोषणा केली होती, की 1 लाख रुपयांपासून डिपॉझिटवर व्याजदर 0.25 टक्के घटवून 3.25 टक्के करण्यात आलं आहे. तसेच 1 लाखांहून जास्त डिपॉझिट केलेली रकमेवरच्या व्याजाला रेपो रेटशी जोडण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा- SBI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! ATM चा वापर, पैसे काढण्याची मर्यादा ते कर्ज दर यांच्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून झालेत महत्त्वाचे बदल

या नव्या नियमानुसार, 50 कोटींहून अधिक रकमेची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी हा नवा नियम लागू होणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांना त्याची सर्व महत्त्वाची माहिती ईमेलद्वारे dirtp14@nic.in यावर पाठवावी लागणार आहे.

यासोबतच सार्वजनिक बँकांच्या वेळापत्रकातही बदल होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, निवासी क्षेत्रातील सर्व बँका सकाळी 9 वाजता उघडतील आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज सुरु राहील. तर व्यापारी क्षेत्रातील वर्गासाठी बँकांची कामकाजाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर उर्वरित सर्व बँका सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील.

1 ऑक्टोबरपासून एसबीआय बँकेच्या नियमात काही बदल करण्यात आले होते. एसबीआय यांच्या नियमांनुसार, आता ग्राहकांना 25,000 रूपयांपर्यंत सेव्हिंग असणार्‍यांना 8-10 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत. तर एसबीआयच्या एटीएममधून केलेले सारे व्यवहार हे मोफत आहेत. मात्र इतर बॅंकेच्या एटीममधून पैसे काढल्यास मेट्रो सिटीमध्ये 5 आणि इतर शहरांमध्ये 3 मोफत ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत.