येत्या 1 मार्चपासून 'या' बँकांचे बंद होणार IFSC कोड, ऑनलाईन मनी ट्रान्सफर करताना होणा-या त्रासापासून वाचण्यासाठी करा हे महत्त्वाचे काम
बँक ऑफ बड़ोदा ने सांगितले की, विजया बँक आणि देना बँकच्या दोन्ही ग्राहकांना आयएफएससी कोड प्राप्त करणे खूपच सोपे आहे.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला भारतातील आर्थिक व्यवहारात काही ना काही बदल होत असतात. त्याचप्रमाणे येत्या 1 मार्चपासून बँक ऑफ बड़ोदा ने आपल्या ग्राहकांना ई-विजया बँक आणि ई-देना बँकचे आयएफएससी कोड 1 मार्च 2021 पासून बंद होणार आहे असे सांगितेल आहे. त्यामुळे ग्राहकांनी या गोष्टीची दखल घेत त्यानुसार ऑनलाईन व्यवहार करावा असे बँकेकडून सांगण्यात येत आहे. बँक ऑफ बड़ोदा ने सांगितले की, विजया बँक आणि देना बँकच्या दोन्ही ग्राहकांना आयएफएससी कोड प्राप्त करणे खूपच सोपे आहे.
BOB ने दिलेल्या माहितीनुसार, विजया बँक आणि देना बँकच्या ग्राहकांना नव्या IFSC कोड माहिती करुन घेण्यासाठी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा Amalgamation बँकेच्या हेल्पडेस्कवर कॉल करु शकता. त्याव्यतिरिक्त संबंधित शाखेशी संपर्क करुन माहिती मिळवू शकता. त्याशिवाय SMS च्या माध्यमातून देखील तुमचा नवा IFSC कोड मिळवू शकता. हेल्पलाईन नंबर 18002581700 वर ग्राहक आपल्या पंजीकृत मोबाईल नंबरवरुन 8422009988 वर जुन्या खात्याचा नंबर च्या शेवटच्या 4 अंकांसहित SMS करु शकता. या फॉर्मेटमध्ये पुढील प्रमाणे मेसेज पाठवायचा आहे. "MIGR <SPACE> जुन्या खात्याचे शेवटचे 4 अंक"हेदेखील वाचा- PayPal भारतामध्ये 1 एप्रिल 2021 पासून Domestic Payment Services बंद करणार
राष्ट्रीयकृत बँकने मागील वर्षी डिसेंबरमध्ये विजया बँक आणि देना बँकेच्या 3898 शाखांच्या मर्जरचे काम पूर्ण केले होते. ज्याच्याअंतर्गत 5 कोटींपेक्षा अधिक ग्राहक खाते स्थलांतरित करण्यात आले होते. बँकेने सांगितले सर्व ग्राहक आता भारतात एकूण 8,248 स्थानिक शाखा आणि 10,318 एटीएमचा फायदा घेऊ शकता. विलीनीकरण केल्यानंतर बँक ऑफ बड़ोदाने मेसेजिंग मंच व्हॉट्सअॅपवर बँकिंग सेवेची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ बड़ोदा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खात्यात बॅलेंसची माहिती, मिनी स्टेटमेंट, धनादेश ची स्थिती, चेकबुक विनंती, डेबिट कार्डला ब्लॉक करणे आणि अन्य सेवेबद्दल माहिती मिळवू शकता.
मेसेजिंग मंचच्या माध्यमातून बँकिंग सेवा 24 तास उपलब्ध असेल. त्यासाठी अतिरिक्त अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची गरज नाही. असे लोक जे बँकेचे ग्राहक नाही, ते सुद्धा या माध्यमातून बँकेच्या सेवा, एटीएम आणि अन्य शाखांबाबत माहिती मिळवू शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)