Indian Railways: मुंबईहून ट्रेन पकडणार असाल तर ही बातमी नक्की वाचा! 'या' गाड्यांची वेळ आणि टर्मिनल बदलले
ट्रेन क्रमांक 19016 पोरबंदर-दादर एक्स्प्रेसमध्ये 01 जुलै 2024 पासून आणि ट्रेन क्रमांक 19015 दादर-पोरबंदर एक्स्प्रेसमध्ये 04 जुलै 2024 पासून पुढील सूचना येईपर्यंत एक एसी कोच जोडण्यात आला आहे.
Indian Railways: मुंबईतील (Mumbai) लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) किंवा मुंबई सेंट्रल (Mumbai Central) यांसारख्या स्थानकांवरून प्रवास करत असाल, तर ही बातमी सविस्तर वाचा. आता रेल्वे काही गाड्यांच्या टर्मिनस आणि संरचनेत बदल करणार आहे. याशिवाय काही गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे. अशा परिस्थितीत, प्रवासाला निघण्यापूर्वी, तुम्ही या गाड्यांची संपूर्ण यादी एकदा तपासणे आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक 19003/04 वांद्रे टर्मिनस - भुसावळ खान्देश एक्स्प्रेस (Bandra Terminus - Bhusawal Khandesh Express) आणि ट्रेन क्रमांक 09051/52 मुंबई सेंट्रल - भुसावळ एक्स्प्रेसचे मूळ स्थानक बदलून दादर स्थानकात आणले जात आहे. ट्रेन क्रमांक 19015/19016 दादर-पोरबंदर एक्स्प्रेस (Dadar-Porbandar Express) मध्ये एक पहिला एसी कोच जोडला जात आहे.
या गाड्यांचे वेळापत्रक बदलले -
गाडी क्रमांक 19003/04 वांद्रे टर्मिनस - भुसावळ खान्देश एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 19003 वांद्रे टर्मिनस-भुसावळ खान्देश एक्स्प्रेसचे टर्मिनल वांद्रे टर्मिनसऐवजी दादरला बदलण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक 19003, जी सध्या दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 00.05 वाजता वांद्रे टर्मिनसवरून सुटते, 04 जुलै, 2024 पासून दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी दादरहून 00.05 वाजता सुटेल. मध्यवर्ती स्थानकांवर या ट्रेनच्या थांबण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 19004 भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस 04 जुलै 2024 पासून वांद्रे टर्मिनसऐवजी दादर स्थानकावर 5.15 वाजता टर्मिनेट होईल. नवसारी आणि बोरिवली स्थानकांदरम्यानच्या आगमन आणि निर्गमनाच्या वेळा सुधारण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Amarnath Yatra Registration: जम्मू मध्ये अमरनाथ यात्रेसाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात; भाविकांची मोठी गर्दी)
गाडी क्रमांक 09051/52 मुंबई सेंट्रल - भुसावळ एक्सप्रेस
गाडी क्रमांक 09051/52 मुंबई सेंट्रल - भुसावळचे टर्मिनल मुंबई सेंट्रलऐवजी दादरला हलवण्यात आले आहे. गाडी क्रमांक 09051 दादर-भुसावळ एक्स्प्रेस आता दादरहून मुंबई सेंट्रलऐवजी दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी 00.05 वाजता सुटेल. मध्यवर्ती स्थानकांवर या ट्रेनच्या थांबण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. हा बदल 03 जुलै 2024 पासून लागू होईल. तसेच गाडी क्रमांक 09052 भुसावळ-दादर एक्स्प्रेस 03 जुलै 2024 पासून मुंबई सेंट्रल ऐवजी दादर स्थानकावर 5.15 वाजता टर्मिनेट होईल. वरील गाड्या 03 जुलै 2024 ते 27 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
ट्रेन क्रमांक 19016/19015 पोरबंदर-दादर एक्स्प्रेसच्या संरचनेत सुधारणा -
ट्रेन क्रमांक 19016 पोरबंदर-दादर एक्स्प्रेसमध्ये 01 जुलै 2024 पासून आणि ट्रेन क्रमांक 19015 दादर-पोरबंदर एक्स्प्रेसमध्ये 04 जुलै 2024 पासून पुढील सूचना येईपर्यंत एक एसी कोच जोडण्यात आला आहे. दरम्यान, ट्रेन क्रमांक 09051 च्या विस्तारित ट्रिपसाठी बुकिंग 01 जुलै 2024 पासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, थांबे आणि संरचनेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)