ICICI बँकेने Lockdown च्या काळात खातेदारांसाठी सुरु केली 'WhatsApp Banking' सेवा, जाणून घ्या सविस्तर
या व्हॉट्सऍप बँकिंग सेवेतून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, मागील तीन महिन्यांच्या व्यवहारांचा तपशील, क्रेडीटकार्ड मर्यादा, प्री अप्रुव्हल लोन, क्रेडीट कार्ड ब्लॉक किंवा अनब्लॉक करणे यासारख्या सुविधा मिळणार आहेत.
कोविड-19 मुळे देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत लोकांना घराबाहेर पडता येत नाहीय. अशा वेळी लोकांना बँकेचे व्यवहार करताना कुठलीही अडचण येऊ नये सर्व बँका ऑनलाईन सेवेचा वापर करण्याचे खातेदारांना आवाहन करत आहे. त्यात ICICI बँकेने आपल्या खातेदारांसाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे ज्याचे नाव आहे ICICI WhatsApp Banking सेवा. या सेवेच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअॅप द्वारा ICICI बँकेचे व्यवहार करु शकता. सोशल नेटवर्किंगसाठी सर्वाधिक वापरला जाणारा व्हॉट्सअॅपचा वापर आयसीआयसीआय बँकेने अशा पद्धतीने करणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
या व्हॉट्सऍप बँकिंग सेवेतून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, मागील तीन महिन्यांच्या व्यवहारांचा तपशील, क्रेडीटकार्ड मर्यादा, प्री अप्रुव्हल लोन, क्रेडीट कार्ड ब्लॉक किंवा अनब्लॉक करणे यासारख्या सुविधा मिळणार आहेत.
पाहा ट्विट:
हेदेखील वाचा- Coronavirus Outbreak: Lockdown च्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया घरबसल्या देणार 'या' सुविधा
कशी Activate कराला ICICI WhatsApp Banking सेवा:
1. ग्राहकाने त्यांच्या फोनमध्ये ICICI बँकेचा ९३२४९५३००१ हा व्हॉट्सऍप क्रमांक सेव्ह करावा लागेल.
2. या क्रमांकावर < Hi > हा मेसेज आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून पाठवावा.
3. यावर बँकेकडून व्हॉट्सऍप सेवांची यादी ग्राहकांना पाठवली जाईल.
4. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ICICI मधील खात्याबाबत जी माहिती हवी आहे ती तिथे सांगितली जाईल.
ICICI बँकेची ही सेवा नक्कीच स्तुत्यप्रिय असून जास्तीत जास्त खातेदारांनी या सेवेचा फायदा घ्यावा जेणेकरुन लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या नियमांचे पालनही होईल आणि तुमच्या बँकचे सर्व व्यवहारही होतील.