Aadhaar-Ration Card Linking: रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी अंतिम मुदत 30 सप्टेंबर; इथे पहा ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून कसे कराल लिंक?

दरम्यान त्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Aadhaar-Ration Card Linking (Photo Credits: UIDAI, Twitter)

भारतामध्ये रेशन कार्ड (Ration Card) हा सर्वात जुना वास्तव्याचा पुरावा म्हणून सादर करता येऊ शकते असा पुरावा आहे. दरम्यान आता भारत सरकारने रेशन कार्ड (Ration Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) यांचं लिंकिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान त्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांचं लिंकिग करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धती सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना शक्य आहे ती मंडळी घरबसल्या देखील हे लिकिंग करू शकतील तर ज्यांच्याकडे साधनं नाहीत ते ऑफलाईन पर्याय निवडू शकतात.

दरम्यान मध्यंतरी जर आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक नसल्यास अन्न पुरवठा केला जाणार नाही अशा बातम्या समोर आल्या होत्या परंतू आता त्यावर स्पष्टीकरण देताना या चूकीच्या बातम्या असल्याचं सांगितलं आहे. देशामध्ये सारी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांची जोडणी करण्यास पुरेसा वेळ दिला जाणार आहे असं म्हटलं आहे.

ऑनलाईन माध्यमातून रेशन कार्ड आणि आधार कार्ड कसे जोडाल?

रेशन कार्ड आणि आधार कार्ड ऑफलाईन माध्यमातून कसे जोडाल?

अत्यावश्यक कागदपत्रं कोणती?

आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांचं लिंकिंग केल्यानंतर आता सरकारला रेशन कार्डचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे. मोफत किंवा कमी दराने मिळणार्‍या अन्नधान्याचा गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,  23.5 कोटी रेशन कार्ड धारकांपैकी 90% रेशन कार्ड आधार सोबत लिंक आहेत. 80 कोटी लाभार्थी परिवारातील किमान एकाचं आधार -रेशन लिंक केलेलं आहे.