IRCTC च्या वेबसाईटवर ऑनलाईन रिजर्व्हेशन चार्ट कसा पहाल?

यामुळे कोणत्या ट्रेनमध्ये किती सीट्स खाली आहेत, याची माहिती प्रवाशांना मिळेल.

Image Used for Representational Purpose only | (Photo Credits: File Photo)

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी रिजर्व्हेशन चार्ट (Reservation Chart) सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्या ट्रेनमध्ये किती सीट्स खाली आहेत, याची माहिती प्रवाशांना मिळेल. रिजर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर IRCTC च्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. नव्या सिस्टमनुसार, चार्ट तयार झाल्यानंतर अवघ्या 4 तासात तो वेबसाईटवर उपलब्ध होईल. तर दुसरा चार्ट ट्रेन सुटण्यापूर्वी 30 मिनिटे उपलब्ध करण्यात येईल. दुसऱ्या चार्टमध्ये पहिल्या चार्टनंतर कॅन्सल झालेल्या तिकीटांनंतर रिकाम्या सीटची माहिती दिली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTC ने सुरु केली नवी 'iPay' पेमेंट सुविधा; ही आहे खासियत

चार्टमधील रिकाम्या सीट्स पाहुन तुम्ही TTE वरुन थेट बुकींग करु शकता. नवीन चार्ट मोबाईल, डेक्सटॉप या दोन्ही व्हर्जन्सवर पाहायला मिळेल. त्याचबरोबर नेमक्या कोणत्या डब्यात सीट कोठे आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर लॉगिन करु शकता. याचा अर्थ कोणताही प्रवासी रिजर्व्हेशन चार्ट पाहु शकतो.

# रिजर्व्हेशन चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.irctc.co.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबासाईटवर बुक आणि तिकीट विंडो मध्ये सर्वात खाली पीएनआर स्टेटसच्या बाजूला चार्ट व्हॅकेन्सी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

# यावर क्लिक केल्यानंतर नवी विंडो ओपन होईल. यात तुम्हाला प्रवासासंबंधित सर्व माहिती मिळेल. यात तुम्हाला ट्रेनचे नाव, नंबर, प्रवासाची तारीख, बोर्डिंग स्टेशन ही सर्व माहिती द्यावी लागेल. त्यानंतर Get Train Chart वर क्लिक करा.

# त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. या विंडोत सीटचा क्लास लिहिलेला असेल. उदा. स्लीपर क्लास, सेकंड सीटिंग, थर्ड एसी, सेकंड एसी. तुम्हाला कोणत्या क्लासमधून प्रवास करायचा आहे त्यावर क्लिक करा.

# स्लीपर क्लासवर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. या विंडोत बोर्डिंग स्टेशनवर खाली सीट्सची माहिती तुम्हाला मिळेल. यात कोणत्या स्टेशनवरुन कोणती बर्थ रिकामी आहे. याशिवाय कोणत्या कोचमध्ये कोणती बर्थ खाली आहे, याचीही माहिती मिळेल.

# या विंडोच्या खाली शेड्युल असे लिहिलेले असेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ट्रेनचे संपूर्ण शेड्युल येईल. यावरुन ट्रेनची किती वेळ विलंबाने असेल, स्टेशनवर किती वाजता पोहचेल, याचीही माहिती मिळेल.

त्यानंतर तुम्ही लगेचच TTE वरुन संपर्क करुन सीट बुक करु शकता. हे तिकीट तुम्ही ऑनलाईन देखील बुक करु शकता. यासाठी तुम्हाला ट्रेनच्या चिन्हावर क्लिक करावे लागेल. रेल्वेच्या या नव्या व्यवस्थेचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे. तसंच IRCTC च्या वेबसाईटवर ऑनलाईन चार्ट पाहण्यासाठी लॉगिन करण्याची गरज नाही.