UIDAI ने केलं अलर्ट, फ्रॉड पासून दूर राहण्यासाठी Aadhar Card असं ठेवा सुरक्षित
आधारकार्ड जारी करणार्या यूनिक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)कडून नागरिकांना वेळोवेळी सतर्क केले जाते.
आजकाल अनेक महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांसाठी ते ओळखपत्र पडताळणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डावर व्यक्तीचे महत्त्वाचे अपडेट्स असतात. पण आधारकार्डचा जसा वापर वाढला आहे तसेच त्याच्यासोबत होणार्या छेडछाडीचेदेखील प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आधारकार्ड जारी करणार्या यूनिक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)कडून नागरिकांना वेळोवेळी सतर्क केले जाते.
'तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आधारशी लिंक आहे की नाही याबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही ही लिंक वापरून तपासू शकता.' असे ट्वीट केले आहे. दरम्यान UIDAI ने म्हटले आहे की जर कोणाकडे त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक करण्याबाबत संपूर्ण माहिती नसेल तर ती पडताळून पाहण्यासाठी myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile या वेबसाइटचा वापर करू शकता. नक्की वाचा: PAN Aadhaar Card Linking: दंड भरून तुमचं आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग कसं कराल पूर्ण .
या स्टेप्स करा फॉलो
- myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile या वेबसाइटला भेट द्या.
- 'Verify Mobile Number' आणि 'Verify Email Address' असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक टाका.
- तुमचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल टाका.
- कॅप्चा योग्यरित्या भरा आणि 'ओटीपी पाठवा' पर्याय निवडा.
- OTP योग्य ईमेल पत्त्यावर किंवा सेल नंबरवर पाठवला असल्यास, ते दर्शवते की तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेली माहिती बरोबर आहे आणि तुमचा फोन नंबर किंवा ईमेल पत्ता त्याच्याशी जोडलेला आहे.