Online RTI: केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय, विभागांमध्ये एकाच ठिकाणी करा माहिती अधिकार अर्ज

या अर्ज भरताना होणाऱ्या चुका टळण्यास मदत होते. आरटीआय अर्ज करताना महत्त्वाची बाब म्हणजे हा अर्ज करण्यासाठी जास्तीत जास्त शब्दमर्यादा ही 3000 शब्द इतकी आहे. तुमचा अर्ज 3000 शब्दांची मर्यादा पार करत असेल तर, तुम्ही वेगळी पीडीएफ अपलोड करु शकता.

RTI Application Online | | (Photo Credits: File Photo)

माहिती अधिकार कायदा (Right to Information Act) राज्य आणि केंद्र सरकारने (Central Government) मंजूर केला. त्यानंतर देशभारतील नागरिकांसाठी माहिती जाणून घेण्याचे जणू एक नवे हत्यारच मिळाले. आतापर्यंत देशभरातील अनेक नागरिकांनी माहिती अधिकार कायदा वापरत अनेक गैरव्यवहार, घोटाळे बाहेर काढले आहेत. तसेच, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यावर अंकुश ठेवला आहे. असे असली तरी अनेकांना हेच माहिती नसते की, माहिती अधिकाराखाली माहिती मागविण्यासाठी अर्ज नेमका कोठे करावा. नागरिकांची ही अडचण ध्यानात घेऊन केंद्र सरकारचा कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग विभाग (Staff and Training Department) आरटीआय ऑनलाईन (RTI Online) हा उपक्रम घेऊन आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण एकाच ठिकाणी ऑनलाइन आरटीआई फाइल करु शकता.

कुठे कराल ऑनलाइन आरटीआई फाइल

ऑनलाइन आरटीआई फाइल करण्यासाठी तुम्हाला आरटीआई ऑनलाइन पोर्टलला भेट द्यावी लागेल. या पोर्टलचा अॅड्रेस https://rtionline.gov.in/ असा आहे. या पोर्टलवर तुम्ही लॉगइन करुन केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्रालय अथवा विभागाची माहिती मागवू शकता. परंतू, या पोर्टलचीही सध्यास्थितीत एक मर्यादा आहे. या पोर्टलद्वारे केवळ केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित कार्यालयांचीच माहिती मागवली जाऊ शकते.  (हेही वाचा, माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मिळाले वापरलेले कंडोम)

अर्ज करण्यासाठी जास्तीत जास्त 3000 शब्दांची शब्दमर्यादा

या पोर्टलवर तुम्हाला आरटीआय फाईल करण्यासाठी योग्य अर्ज उपलब्ध असतो. या अर्ज भरताना होणाऱ्या चुका टळण्यास मदत होते. आरटीआय अर्ज करताना महत्त्वाची बाब म्हणजे हा अर्ज करण्यासाठी जास्तीत जास्त शब्दमर्यादा ही 3000 शब्द इतकी आहे. तुमचा अर्ज 3000 शब्दांची मर्यादा पार करत असेल तर, तुम्ही वेगळी पीडीएफ अपलोड करु शकता.