Aadhaar Card: मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यास 'असे' डाऊनलोड करा आधार कार्ड; फॉलो करा 'या' स्टेप्स
आधार कार्ड शिवाय बँके संबंधित कामं, शाळेचे अॅडमिशन, इनकम टॅक्स आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही.
प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) हे अगदी महत्त्वपूर्ण ओळखपत्रं आहे. आधार कार्ड शिवाय बँके संबंधित कामं, शाळेचे अॅडमिशन, इनकम टॅक्स आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. हे आवश्यक आणि महत्त्वाचे कार्ड नागरिक UIDAI च्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. विशेष म्हणजे यासाठीची प्रक्रीया खूप मोठी देखील नाही आहे. मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास तुम्ही ते अगदी सहज करु शकता. मोबाईल नंबर रजिस्टर नसलेल्या नागरिकांसाठी निक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. (Aadhaar Card Update: आधार कार्ड बाबत UIDAI ने वेबसाईट वरून बंद केल्या 'या' दोन सुविधा; इथे पहा अधिक माहिती)
यापूर्वी यासाठी तुमच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य असणार आहे. मात्र आता याची आवश्यकता नाही. मोबाईल नंबर रजिस्टर नसतानाही तुम्ही अगदी सहज आधार कार्ड डाऊनलोड करु शकता. त्यासाठी जाणून घेऊया सोप्या स्टेप्स...
# आधार डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि नंतर MyAadhaar विभागात टॅप करा.
# त्यानंतर तुम्हाला ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करावे लागेल.
# मग तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. याऐवजी तुम्ही 16 डिजिटचा व्हर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर (VID) देखील दाखल करु शकता.
# ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर सिक्युरिटी किंवा कैप्चा कोड एंटर करा.
# आधारशी मोबाईल नंबर रिजस्टर नसताना आधार कार्ड डाऊनलोड करु इच्छित असाल तर My number is not registered या ऑप्शनवर क्लिक करा.
# यानंतर तुम्हाला तुमचा पर्यायी क्रमांक किंवा नोंदणीकृत नसलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
# यानंतर तुम्हाला Send OTP वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर ओटीपी तुमच्याद्वारे एंटर केलेल्या ऑप्शन नंबरवर येईल.
# नियम आणि अटींचे चेक बॉक्सवर क्लिक करा.
# नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
# त्यानंतर तु्म्हाला नव्या पेजवर रिडिरेक्ट केले जाईल.
# मग री-प्रिटिंग व्हेरिफाय करुन युजर्सला तेथे प्रीव्हू आधार लेटरचे ऑप्शन मिळेल.
# त्यानंतर Male Payment हा पर्याय निवडा.
# त्यानंतर युजर्संना डिजिटल स्वाक्षरी तयार ठेवावी लागेल. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी ती सबमिट करावी लागेल.
# शेवटी SMS द्वारे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल. या नंबर द्वारे तुम्ही अॅप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करु शकता.
अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसताना देखील आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.