Aadhaar Card Update: Face Authentication फीचरचा वापर करून uidai.gov.in वरून आधार कार्ड डाऊनलोड कसं कराल?
आता UIDAI ने face authentication द्वारा देखील आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे.
आधार नंबर हा 12 डिजिट असा नंबर असतो जो UIDAI कडून रहिवासी पत्त्याचा आणि आयडी प्रुफ म्हणून ग्राह्य धरण्यासाठी दिला जातो. बॅंकेच्या कामांपासून अगदी इन्कम टॅक्स विभाग आणि टेलिकॉम कंपन्यांना आयडी ऑथंटिकेशन साठी दिला जातो. काही महिन्यांपूर्वीच UIDAI ने all-new Aadhaar PVC card लॉन्च केले आहे. जे एटीएम कार्ड प्रमाणे असतं, सोबतच त्यात लेटेस्ट सिक्युरिटी फीचर्स देखील आहेत. पण तुमचं आधार कार्ड हे डाऊनलोड करणं आवश्यक आहे. सध्या यामध्ये डाऊनलोडसाठी 2 पर्याय दिलेले आहेत. एकामध्ये तुम्हांला enrollment number तर दुसर्या मध्ये Aadhaar number वापरून ते डाऊनलोड करता येतं. पण आता UIDAI ने face authentication द्वारा देखील आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. PVC Aadhar Card: एकाच मोबाईल क्रमांकावर संपूर्ण परिवाराचे बनवता येणार ATM सारखे आधार कार्ड, जाणून घ्या कसे.
फेस ऑथंटीकेशन हा नवा पर्याय तुम्हांला इंटरेस्टींग वाटतोय? मग पहा या फीचरचा वापर करून तुमचं आधारकार्ड कसं डाऊनलोड करू शकाल?
- UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- 'Get Aadhaar Card'या पर्यायावर क्लिक करा.
- Aadhaar Card section मध्ये तुम्हांला face authentication चा पर्याय निवडावा लागेल.
- हा पर्याय सिलेक्टकरण्यापूर्वी तुम्हांला मोबाईल नंबर आणि CAPTCHA एंटर करावा लागेल.
- आता तुम्हांला authentication process मध्ये तुमचा चेहरा व्हेरिफाय करण्याची सोय आहे.
- UIDAI आपोआप तुमचा फोटो क्लिक करेल.
- तुमचा फोटो क्लिक झाला आणि व्हेरिफाय झाला की तुमचं कार्ड डाऊनलोड साठी सज्ज असेल.
दरम्यान आधार कार्ड सध्या 4 विविध पद्धतीमध्ये उपलब्ध आहे आणि ही सारीच कार्ड वॅलिड आहेत. पेपर आधार कार्ड हे लॅमिनेट असून त्यावर सिक्युअर क्यू आर कोड असतो. तुम्ही अप्लाय केल्यानंतर ते मोफत घरपोच मिळतं. ई आधार हे डिजिटली साईड असतं. UIDAI च्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. mAadhaar हे डिजिटल फॉर्म मधील असून मोबाईल डिवाईस मध्ये इंस्टॉल करता येतं. Aadhaar PVC Card हे नवं असून 50 रूपये देऊन ते मिळवता येऊ शकतं.