ATM म्हणजे काय? Automated Teller Machine चा वापर करून सुरक्षित आर्थिक व्यवहार करताना या गोष्टींबाबत अलर्ट रहाच!

एटीएमने पैसे काढणं हे सुरक्षित असल्याने तुम्ही केवळ डेबिट, क्रेडीट कार्ड वापरून पैसे काढू शकता.

ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

आज देशाच्या कानाकोपर्‍यामध्ये पैसे काढण्यासाठी ATM चा वापर केला जातो. Automated Teller Machine द्वारा आता कार्डस मदतीने देशभरात कुठूनही पैसे काढले जातात. टेक्नॉसॅव्ही नसलेल्यांना किंवा पहिल्यांदा एटीएम कार्डचा वापर करणार्‍यांना अशाप्रकारे पैसे काढताना भीती वाटणं सहाजिक आहे. परंतू हळूहळू हे सवयीचं झालं की आपोआपच तुम्हांला त्याची सवय होते. मग तुम्हांला पैसे काढण्यासाठी बॅंकेच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही अगदी तुमच्या सोयीनुसार, आवश्यकतेनुसार सहज पैसे काढू शकता. एटीएमने पैसे काढणं हे सुरक्षित असल्याने तुम्ही केवळ डेबिट, क्रेडीट कार्ड वापरून पैसे काढू शकता. SBI चे ATM कार्ड अ‍ॅपच्या माध्यमातून On-Off द्वारे कंट्रोल करु शकता, तुमचे पैसे अधिक सुरक्षित राहणार.  

ATM म्हणजे काय?

ATM द्वारा तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय सहज पैसे काढू शकता. आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ATM मशीन केवळ पैसे काढण्यापुरता वापरता येते असे नाही तर त्यावर तुम्ही बॅंक अकाऊंटमधील डिटेल्स पाहू शकता, मिनी स्टेटमेंट पाहू शकता. सोबत दोन अकाऊंट्समध्ये व्यवहार करता येतो, बिल पेमेंट्स होतात, पैसे डिपॉझिटदेखील होतात. दरम्यान या आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांना काही ठराविक शुल्क देखील आकारलं जातं. ATM च्या सहाय्याने करा बँकेची 'ही' कामे, रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचेल.

ATM कार्डची साईज

ATM हे अंदाजे 85.60 mm × 53.98 mm (3.370 in × 2.125 in) आकाराचं असतं. दरम्यान हे कार्ड सुरक्षित व्यवहारासाठी असावं याकरिता मॅग्नेटिक स्ट्रिप ऐवजी आता EMV chip सोबत बनवलं जातं.

ATM मधून पैसे कसे काढाल?

ATM मधून पैसे काढताना तुम्ही सुरक्षित असणं गरजेचे तुमच्या आजुबाजूला कुणी अनोळखी व्यक्तीना नाहीना? याची खात्री करा कारण आर्थिक व्यवहार होत असताना तुमची महत्त्वाची माहिती त्यांना समजू शकते.

  • व्यवहार सुरू करण्यासाठी तुम्हांला एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड मशीन मध्ये इंसर्ट करावं लागेल.
  • त्यानंतर स्क्रिनवर पुढील माहिती दिली जाईल त्यानुसार व्यवहार करा.
  • प्रामुख्याने यामध्ये तुमचा 4/6 अंकी पिन नंबर, व्यवहाराचं स्वरूप विचारले जाते.
  • पैसे काढायचे असतील तर ते कोणत्या अकाऊंट मधून काढायचे आहेत याची माहिती विचारली जाते. किती रूपये काढायचे आहेत ते विचारलं जातं.
  • त्यानंतर तुम्हांला व्यवहाराची प्रिंट कॉपी हवी का? असा प्रश्न विचारला जातो.
  • दरम्यान पैसे विशिष्ट वेळेतच तुम्हांला घेणं आवश्यक आहे अन्यथा ते पुन्हा आतमध्ये जाऊ शकतात.
  • तसेच व्यवहार संपल्याची खात्री करूनच एटीएम सेंटरमधून बाहेर पडा.

ATM मशीनचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

  • ATM सेंटरमध्ये तुम्ही सुरक्षित व्यवहार करताय याची खात्री करा.
  • पिन नंबर लक्षात ठेवून तो नीट एंटर करा.
  • व्यवहार झाल्यानंतर तुमचं कार्ड परत घ्यायला विसरू नका. तसेच ते सुरक्षित ठेवा.
  • बॅंकेसोबत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा म्हणजे आर्थिक व्यवहाराचे अपडेट तुमच्याकडे राहतील.
  • काही संशयास्पद मशीन किंवा व्यक्ती तुमच्या आजुबाजुला नाही याबाबत जागृत रहा.
  • तुमचं एटीएम कार्ड हरवलं किंवा चोरलं गेलं तर त्याची बॅंकेला माहिती देऊन तात्काळ ब्लॉक करा.
  • ठराविक दिवसांनी तुमच्या बॅंक अकाऊंट आणि बॅंकेकडून पाठवल्या जाणार्‍या नोटिफिकेशन एसएमएसकडे लक्ष द्या.

ATM चा वापर करताना कटाक्षाने टाळा या गोष्टी

  • कोणालाही तुमचं डेबिट कार्ड देऊ नका. पिन नंबर शेअर करू नका.
  • तुमचा व्यवहार सुरू असता कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नका, बोलणं टाळा.
  • वॉलेट वर किंवा इतरत्र स्पष्ट वाचता येईल समजेल असा पिन नंबर लिहू नका.
  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीची थेट मदत घेताना महत्त्वाची माहिती शेअर करू नका.
  • सहज अंदाज लावता येईल असे पिन नंबर बनवू नका. जन्मतारीख, फोन नंबर टाळा.

सामान्यपणे आता डेबिट कार्ड्स हेच एटीएम कार्ड म्हणून दिले जाते. त्यावर तुमचं नाव, कार्ड नंबर, एक्सपायरी डेट पुढच्या बाजूला तर सीवीवी नंबर मागच्या बाजूला नमुद केलेला असतो. या कार्डच्या मदतीने ऑनलाईन व्यवहारदेखील करता येतो. हे कार्ड तुमचं ज्या बॅंकेमध्ये अकाऊंट आहे त्या बॅंकेकडूनच दिलं जातं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now