PF Balance: पीएफ अकाऊंट बॅलन्स SMS, Missed Call, Umang App आणि EPFO Portal द्वारे कसा चेक कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने अगदी सहज होत आहेत.

EPFO (Photo Credits-Facebook)

पीएफ (PF) संबंधित कामांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (Employees Provident Fund Organisation) म्हणजेच पीएफच्या ऑफिसमध्ये जाण्याची आता गरज नाही. अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने अगदी सहज होत आहेत. टेक्नोलॉजीने अनेक गोष्टी अगदी सोप्या केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा EPF बॅलन्स घरबसल्या चेक करु शकता. त्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे. (PF Balance Check: आता UAN नंबरशिवाय चेक करू शकता तुमचा पीएफ बॅलन्स; 'या' सोप्या स्टेप्सद्वारे घ्या जाणून)

पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. एसएमएस (SMS), ईपीएफओ पोर्टल (EPFO Portal), उमंग अॅप (Umang App) किंवा अगदी मिस कॉलद्वारेही (Missed Call)  तुम्ही पीएफ बॅलन्स चेक करु शकता.

SMS:

पीएफ चेक करण्यासाठी तुमच्या रजिस्ट्रर मोबाईल नंबरवरुन “EPFOHO UAN LAN” असा मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा. शेवटची तीन अक्षरं भाषा दर्शवतात. उदा. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असल्यास "EPFOHO UAN HIN" असा मेसेज सेंड करा.

मिस कॉल:

तुमच्या रजिस्ट्रर मोबाईल नंबरवरुन 011-22901406 या नंबरवर मिस कॉल द्या. लवकरच तुम्हाला पीएफ अकाऊंट डिटेल्स आणि बॅलन्स सांगणारा एसएमएस येईल.

उमंग अॅप:

फोनमध्ये उमंग अॅप ओपन करा आणि EPFO वर क्लिक करा. employee-centric services वर क्लिक करा. त्यानंतर view passbook वर क्लिक करा आणि Universal Account Number (UAN) एंटर करा. त्यानंतर तुमच्या रजिस्ट्रर मोबाईल नंबरवर OTP येईल.

EPFO मेंबर ई-सेवा पोर्टल:

EPFO च्या अधिकृत वेबसाईट epfindia.gov.in ला भेट द्या आणि e-passbook लिंकवर क्लिक करा. तुम्हाला नवं पेज passbook.epfindia.gov.in. वर रिडिरेक्ट केले जाईल. तिथे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर Download/View Passbook क्लिक करा. तुमचा पीए अकाऊंट बॅलन्स स्क्रिनवर दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही अगदी सहज पीएफ अकाऊंट बॅलन्स चेक करु शकता. तर यापैकी कोणता पर्याय तुम्हाला सोयीस्कर वाटतो, ते पहा आणि तुमचा पीए बॅलन्स चेक करा.