Aadhaar-Bank Linking Status: आधार कार्ड-बँक अकाऊंट लिकिंग स्टेटस uidai.gov.in वर ऑनलाईन कसा तपासाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
देशातील आधार कार्डचे महत्त्व सर्वश्रूत आहे. अत्यंत महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक असं हे कार्ड बँक अकाऊंटला संलग्न करणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. आधार कार्ड बँक अकाऊंटला जोडल्यास अनेक सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.
देशातील आधार कार्डचे (Aadhaar Card) महत्त्व सर्वश्रूत आहे. अत्यंत महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक असं हे कार्ड बँक अकाऊंटला (Bank Account) संलग्न करणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. आधार कार्ड बँक अकाऊंटला जोडल्यास अनेक सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुमचे आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक आहे की नाही, हे तपसाण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तसंच आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिकिंग ऑनलाईनही करु शकता. मात्र त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे गरजेचे आहे.
तुम्ही तुमचे आधार-बँक अकाऊंट यापूर्वीच जोडले असेल आणि तुम्हाला त्याचे स्टेटस चेक करण्याचे असल्यास खालील स्टेप्स फॉलो करा, तसंच बँक अकाऊंट-आधार कार्ड लिंकिंग स्टेटस चेक थेट चेक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. (Aadhaar-UAN Linking: तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत Aadhaar Number UMANG App द्वारा, EPFO Portal वर, ऑफलाईन कसा लिंक कराल?)
Aadhaar Card-Bank Linking Status चेक करण्यासाठी सोप्या स्टेप्स:
# आधार कार्ड-बँक अकाऊंट लिकिंग चेक करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर UIDAI वर रजिस्ट्रर असणे गरजेचे आहे.
# आधार कार्ड-बँक अकाऊंट लिकिंगची माहिती NPCI Server मधून घेतली जाते.
# युजर्स NPCI mapper वरुन आधार कार्ड-बँक अकाऊंट लिकिंगची माहिती मिळवू शकतात.
# तिथे तुमचा 12 अंकी आधारकार्ड नंबर आणि 16 अंकी व्हर्च्युअल आयडी एंटर करा.
# सिक्युरिटी कोड टाका. बॉक्समध्ये दिसत असलेले अंक, अक्षर, चिन्ह जशीच्या तशी एंटर करा.
# त्यानंतर तुमच्या रजिस्ट्रर मोबाईल नंबरवर OTP किंवा TOTP येईल.
# आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिकिंगचे स्टेटस तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
UIDAI च्या सर्व्हरवर दाखवल्या जाणाऱ्या कुठल्याही माहितीच्या अचूकतेसाठी UIDAI जबाबदार राहणार नाही. तसंच NPCI सर्व्हरकडून मिळणारी कुठलीही माहिती UIDAI स्वत:कडे स्टोअर करत नाही.
आधार कार्ड हा 12 अंकी नंबर UIDAI कडून देण्यात आलेला असतो. भारतीय नागरिकांना व्हेरिफिकेशन प्रोसेसनंतर तो देण्यात येतो. भारत देशाच्या नागरिक असणारी कोणतीही व्यक्ती आधारकार्ड साठी अप्लाय करु शकते. यात वय, लिंग असा कोणत्याही प्रकारचा भेद केला जात नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)