How to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
अनेकदा असे होते पॅनकार्डमधील आपल्याला नाव बदलायचे असते मात्र त्यासाठी कोणत्या पद्धतीने जावे, काय करावे हे अनेकांना माहित नसते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या पद्धतींचा वापर करा.
आपल्या दैनंदिन जीवनात मोठे आर्थिक व्यवहार, लोन, बँक खाते यांसारख्या पैशाशी संबंधित काहीही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी पॅनकार्ड (Pan Card) फार महत्त्वाचे असते. पर्मनंट अकाउंट नंबर म्हणून ओळखले जाणारे पॅन कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी फार महत्त्वाचे असते. त्याहून महत्त्वाचे त्यावरील तुमची सर्व माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे. तसे नसल्यास हा एक प्रकारचा गुन्हा समजला जाऊ शकतो वा त्याचा दुरुपयोगही केला जाऊ शकतो. त्यामुळे यावरचे सर्व डिटेल्स हे अचूक असले पाहिजे. जर यात असलेल्या नावात काही दुरुस्ती करायची असेल वा नाव बदलायचे (Re Correct Name or Change Name) असेल तर त्वरित करुन घेणे गरजेचे आहे.
अनेकदा असे होते पॅनकार्डमधील आपल्याला नाव बदलायचे असते मात्र त्यासाठी कोणत्या पद्धतीने जावे, काय करावे हे अनेकांना माहित नसते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या पद्धतींचा वापर करा.
1. पॅन कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे जाऊन ‘Apply Online’ हा पर्याय निवडा.
2. ‘Application Type’ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बदल किंवा दुरुस्ती म्हणजे ‘changes or correction in existing PAN Data/ Reprint of PAN Card (No changes in existing PAN data) हा पर्याय दिसेल. त्यानंतर शेजारच्या कॅटेगरीवर क्लिक करुन ‘Individual’ हा पर्याय निवडा. Update Aadhaar Address Online: घरबसल्या आधार कार्ड मध्ये पत्ता कसा अपडेट कराल?
3. त्यानंतर त्याच ‘Apply Online’ फॉर्ममध्ये टायटल, तुमचे नाव/आडनाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, पॅन नंबर, नागरीकत्व, कॅपचा कोड याची सर्व माहिती भरुन ‘सबमिट’ बटन क्लिक करा.
4. सर्व माहिती भरुन दिल्यानंतर एनएसडीएलची ऑनलाइन पॅन अॅप्लिकेशन सेवा वापरल्याबद्दल आभार मानणारा एक मेसेज तुम्हाला कॉम्प्युटरवर दिसेल. तुमच्या अर्जाची नोंद झाल्याचा तुम्हाला एक टोकन नंबर दिसेल. पॅन अॅप्लिकेशनमध्ये तुम्ही जो ई-मेल आयडी दिला असेल, तिथे सुद्धा असाच संदेश जाईल. त्यानंतर उर्वरित पॅन अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी Continue with PAN Application Form वर क्लिक करा.
5. पॅन कार्डमध्ये नाव दुरुस्तीसाठी ‘Apply Online’ फॉर्म भरताना आधार कार्डावर असलेले नाव टाकावे लागेल. तुम्हाला फोटो, स्वाक्षरी बदलायची असेल तर, फोटो मिसमॅच, स्वाक्षरी मिसमॅच हे ऑप्शन्स क्लिक करावे लागतील. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही ‘नेक्सट’वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचे बदल नोंदवून घेतल्याची एक स्लीप मिळेल.
या पद्धतीने तुम्ही तुमचे पॅनकार्ड मधील नाव बदलू शकता वा दुरुस्त करु शकता. पण ही सर्व माहिती नीट काळजी पूर्वक भरा. यात कुठल्याही शुद्धलेखनाच्या चुका करू नका.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)