2000 च्या नोटांची छपाई झाली बंद; जाणून घ्या त्या मागची कारणं

माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर आरबीआयनं माहिती दिली आहे की या आर्थिक वर्षात 2000 च्या एकाही नोटेची छपाई करण्यात आलेली नाही.

RS 2000 Note (Photo Credit: PTI)

नोटबंदीमुळे 2016 साली केंद्रसरकारने 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून 2000 च्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने आणल्या. परंतु आता या नोटांची छपाई बंद करण्यात आली असल्याचं रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर आरबीआयनं माहिती दिली आहे की या आर्थिक वर्षात 2000 च्या एकाही नोटेची छपाई करण्यात आलेली नाही. परंतु या निर्णयामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

सरकारने 2000 रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्याची मीडियामध्ये चर्चा होती. परंतु केंद्र सरकार व आरबीआयनं ही चर्चा फेटाळून लावली. तसेच केंद्रीय अर्थ खात्याचे तत्कालीत सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी देखील ट्विटद्वारे पुरेशा नोटा चलनात असल्याचं म्हटलं होतं.

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी! PF सोबत कापण्यात येणाऱ्या पेन्शन काढण्याच्या नियमात बदल होण्याची शक्यता

परंतु आता आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार 2000 नोटा बंद केल्या असल्याने आर्थिक जाणकारांच्या मते काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस नोटा या सर्व गोष्टींना आळा घालणे हे या मागचं मुख्य कारण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळा पैसा बाळगणाऱ्यांना या नोटा जमा करण्यास अडचणी येतील, तसेच बोगस नोटांचा व्यापार करणाऱ्यांसमोरील अडचणी वाढतील.