Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणामध्ये जोरदार फेरबदल, काँग्रेसच्या पंजापुढे धावले भाजपचे कमळ
हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होताना दिसत आहे. सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, आता भाजप आघाडीवर आहे.
Strong Reshuffle in Haryana: हरियाणा विधानसभा निवडणूक मतमोजणी (Haryana, Haryana, Assembly Elections 2024) सुरु असून, हाती येणारे प्राथमिक कल क्षणाक्षणाला उत्कंटा वाढवत आहेत. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच या राज्यात काँग्रेस पक्ष (Congress Party) मोठ्या प्रमाणावर आघाडी घेताना दिसत होता. ही आघाडी कायम राहिल्यास हा पक्ष स्वबळावर बहुमत मिळवत सत्तासमीप पोहोचताना दिसत होता. मात्र, मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसा मोठ्या प्रमाणावर फेरबदल पाहायला मिळत आहे. सध्यास्थितीत भाजप (BJP Party) जवळपास 47 जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेस 37 जागांवर काँग्रेस आघाडी घेताना दिसत आहे. याचाच अर्थ दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये जवळपास 10 जागांचे अंतर आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत किती उमेदवार?
हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या वेळी एकूण एकूण 1,031 उमेदवार मैदानात होते. त्यातील 464 उमेदवार अपक्ष आहेत. तर 101 महिला उमेदवार आहेत. उर्वरीत पुरुष उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी राज्यात 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्यात मतान पार पडले. सत्ता स्थापन करताना बहुमतासाठी आवश्यक असलेला 46 हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे तो आकडा जो पक्ष गाठेल त्याला सत्ता स्थापन करता येणार आहे. (हेही वाचा, Assembly Election Results 2024: हरियाणा, जम्मू कश्मीर मध्ये कॉंग्रेस च्या बाजूने कल; दिल्लीत AICC Headquarters मध्ये कार्यकर्त्यांची लाडू वाटण्यास सुरूवात)
भाजपची अँटीइनकंबन्सीची भीती
हरियाणामध्ये पाठिमागील 10 वर्षांपासून भाजप सरकार आहे. या वेळी कोणत्याही परिस्थीतीच सत्ता मिळवायचीच ही खुणगाठ बांधून काँग्रेस मैदानात उतरला होता. जनमानसात भाजपलाही अँटीइनकंबन्सीचा सामना करावा लागत होता. अशा स्थितीत सत्ताधारी असल्याने भाजपला लाकांचा आणि विरोधकांचा सामना करणे कठीण जात होते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय नेत्यांच्या आधारे भाजप प्रचारात उतरला होता. दुसऱ्या बाजूला, काँग्रेसची बहुतांशी भिस्त ही राहुल गांधी यांच्यावर होती. शिवाय स्थानिक नेतृत्वाकडेही मोठी कमान सोपविण्यात आली होती. प्रचारातील एकूण कल पाहता काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली होती. पण, काही प्रमाणात काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत होती. राज्य पातळीवरील दोन शिर्षस्थ नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष असल्याच्या चर्चा होत्या. पण, त्याचा मतांवर विशेष फरक पडणार नाही, असे बोलले जात होते.
दरम्यान, आज सकाळी मतमोजणी सुरु झाली तेव्हा सुरुवातीचा काही काळ राजकीय वर्तुळातील चर्चेप्रमाणे काँग्रेस खरोखरच मोठी आघाडी घेताना दिसत होती. मात्र, पुढच्या काहीच तासाच चित्र बदलले आणि मोठा फेरबदल पाहायला मिळू लागला. भाजप अचानक मोठी आघडी घेताना दिसली. ज्यामुळे काँग्रेस बॅकफूटला फेकली गेली. तर भाजप बहुमताच्या आकड्यापर्यंत आघाडी घेत असल्याचे कल येऊ लागले. सध्यास्थितीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये 10 जागांचे अंतर आहे. अर्थात अद्याप कोणत्याही जागेचा निकाल जाहीर झाला नसला तरी, भाजपने 10 जागी आघाडी घेतल्याचे चित्र आहे..
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)