Happy New Year 2021: नव्या बदलांना सामोरे जा! 1 जानेवारीपासून लँडलाईन, मोबाईल काँलिंग करताना वापरा '0'; WhatsApp, आणि Twitter बाबत होणार 'हे' बदल; गॅस सिलिंडर, गाड्यांच्या किमती महागण्याची शक्यता
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून आपल्या मोबाईल फोन, लँडलाईन आणि WhatsApp, Twitter यांच्याबाबत काही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. हे बदल वेळीच जाणून घ्या म्हणजे लँडलाईन (Telephone Call), मोबाईल ( Mobile Calling) , ट्विटर, व्हॉट्सअॅप वापरताना आपल्याला संभाव्य अडचणी टाळता येतील.
सरत्या वर्षाला निरोप देऊन 2021 (Happy New Year 2021) या नव्या कोऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असाल. तर, नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारीही ठेवा. होय, कारण नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून आपल्या मोबाईल फोन, लँडलाईन आणि WhatsApp, Twitter यांच्याबाबत काही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. हे बदल वेळीच जाणून घ्या म्हणजे लँडलाईन (Telephone Call), मोबाईल ( Mobile Calling) , ट्विटर, व्हॉट्सअॅप वापरताना आपल्याला संभाव्य अडचणी टाळता येतील.
फोनमधून Whatsapp बंद (?)
फोनमधून वॉट्सअॅप बंद म्हटल्यावर कदाचित आपल्याला आश्चर्य वाटले असेल. पण फार आश्चर्य वाटून घेऊ नका. जुन्या फोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. ज्या फोनचा अँड्रॉईड (Android) आणि आयफोन (iPhone) सपोर्ट काढलेला आहे त्यातील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टम आणि त्यापेक्षाही जुन्या वर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये WhatsApp काम करणार नाही. जर तुमच्याकडे iPhone 4s, iPhone 5s, iPhone 5C, iPhone 6, iPhone 6s असेल तर त्याचे सॉफ्टवेअर अपडेट करुन तुम्ही व्हॉट्सअॅप वापरु शकता.
लँडलाईन, मोबाईल कॉलिंगपूर्वी '0' लावा
एक जानेवारीपासून तुम्ही कोणत्याही मोबाईल, अथवा लँडलाईन क्रमांकावर फोन लावणार असाल तर त्या क्रमांकापूर्वी '0' लावणे आवश्यक असणार आहे. म्हणजे जर तुम्ही त्या क्रमांकासमोर 0 लावले नाही तर तुमचा कॉल संबंधित व्यक्तीला लागणार नाही. येत्या 15 जानेवारीपासून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून फिक्स्ड फोन म्हणजेच लँडलाईन वरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठीही '0' लावणे आवश्यक आहे. नव्या बदलांसाठी टेलिकॉम विभागाने कंपन्यांना 1 जानेवारीपासून आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
ट्विटर (Twitter)
तुम्ही जर ट्विटर युजर्स असाल तर 20 जानेवारीपासून आपल्याला एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. 20 जानेवारीपासून ट्विटरने अकाऊंट व्हेरीफिकेशन प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता सर्व युजर्सना आपले अकाऊंट व्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. नव्या धोरणानुसार ट्विटर युजर्सना ट्विटर वापरताना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्यास युजर्सचे व्हेरीफिकेशन बँच म्हणजेच ब्लु टीक अॅटोमेटीकली हटवले जाईल.
सिलिंडर, गाड्या महागल्या
नव्या वर्षात सिलिंडर दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कदाचित प्रत्येक आठवड्याला सिलिंडरचे दर बदलू शकतात. दुसऱ्या बाजूला ऑटो विश्वात आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि 2020 मध्ये कोरोना व्हायरस संकटामळे घ्यावा लागण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी कार उत्पादक कंपन्या आपल्या वाहन विक्री दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
फास्टॅग अनिवार्य
नव्या वर्षात तुम्ही जर वाहनाने प्रवास करत असाल तर तुम्हाला फास्टॅग अनिवार्य आहे. तुम्हाला तुमच्या वाहनाला फास्टॅग अनिवार्य आहे. कारण, अपवाद वगळता टोल नाक्यांवरुन तुमचे वाहन पुढे सोडले जाणार नाही.
नव्या वर्षाचे स्वागत करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे सरकारकडून अवाहन करण्यात आले आहे. 2020 हे वर्ष कोरोा व्हायरस घेऊन आले. आता 2020 हे वर्ष जाता जाता कोरोना व्हायरस ही भेट किंवा ती आठवण तशीच मागे सोडून निघाले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)