LPG Cylinder स्वस्तात मिळण्याची उत्तम संधी! ग्राहकांना मिळू शकतो 2700 रुपयांचा फायदा, 'अशी' करा बुकिंग
तुम्हाला LPG सिलिंडरच्या बुकिंगवर 2700 रुपयांचा बंपर लाभ मिळू शकतो. या ऑफरमध्ये तुम्हाला आणखी बरेच फायदे मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त 'Paytm' द्वारे गॅस बुक करावा लागणार आहे.
वाढत्या महागाईच्या काळात LPG ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही स्वस्तात एलपीजी सिलेंडर बुक करू शकता. विशेष ऑफर अंतर्गत, तुम्हाला LPG सिलिंडरच्या बुकिंगवर 2700 रुपयांचा बंपर लाभ मिळू शकतो. या ऑफरमध्ये तुम्हाला आणखी बरेच फायदे मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त 'Paytm' द्वारे गॅस बुक करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत आणि या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल. (वाचा - Post Office Scheme: दररोज 95 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 14 लाख रुपये, जाणून घ्या पोस्ट ऑफिसची 'ही' खास योजना)
Paytm वर एलपीजी बुकिंगवर बंपर कॅशबॅक -
या विशेष ऑफर अंतर्गत, जर तुम्ही पेटीएमने एलपीजी सिलेंडर बुक केले, तर तुम्हाला थेट 2,700 रुपयांचा फायदा मिळेल. पेटीएमने एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर कॅशबॅक आणि इतर अनेक बक्षिसे जाहीर केली आहेत. पेटीएमने 3 Pay 2700 Cashback Offer नावाची योजना सुरू केली आहे. नवीन वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. ज्यामध्ये त्यांना सलग तीन महिन्यांच्या पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंतचा खात्रीशीर कॅशबॅक मिळणार आहे.
900 रुपयांपर्यंत कॅशबॅक -
या ऑफरमध्ये नियम आणि अटी देखील आहेत. वास्तविक, हा कॅशबॅक फक्त त्या ग्राहकांनाच मिळेल ज्यांनी पहिल्यांदा एलपीजी सिलिंडर बुक केले आहेत. दर महिन्याला तीन गॅस सिलिंडर बुक केल्यावर, तुम्हाला पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक तीन महिन्यांसाठी उपलब्ध असेल. हा कॅशबॅक 10 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत असू शकतो.
याशिवाय, पेटीएम विद्यमान वापरकर्त्यांना प्रत्येक बुकिंगवर निश्चित रिवॉर्ड्स आणि 5000 रुपायांचा कॅशबॅक पॉइंट्स देखील ऑफर करेल. ज्यात उत्कृष्ट डील आणि टॉप ब्रँड्सच्या गिफ्ट व्हाउचरचा समावेश असेल. पेटीएमने काही काळापूर्वी आपल्या अॅपमध्ये एक नवीन फीचर देखील जोडले आहे. ज्यामध्ये यूजर्स सिलेंडर बुक केल्यानंतर त्याची डिलिव्हरी देखील ट्रॅक करू शकतात. याशिवाय सिलेंडर भरण्याचे रिमाइंडरही फोनवर येईल.
'पेटीएम पोस्टपेड' योजना -
ही '3 Pay 2700 Cashback Offer' सर्व 3 प्रमुख LPG कंपन्यांच्या सिलिंडरच्या बुकिंगवर लागू आहे. इंडेन (Indane), HP गॅस (HP Gas) आणि भारतगॅस (BharatGas). 'Paytm पोस्टपेड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'Paytm Now Pay Later' प्रोग्राममध्ये नोंदणी करून पुढील महिन्यात ग्राहकांना सिलिंडर बुकिंगचे पेमेंट करण्याची संधी मिळेल.
ग्राहकांना असा मिळेल कॅशबॅक -
1. यासाठी तुम्ही प्रथम पेटीएम अॅप डाउनलोड करा.
2. यानंतर सिलेंडर बुकिंगवर जा. त्यानंतर तुमची गॅस एजन्सी निवडा. यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय दिसतील.
3. यानंतर तुमचा नोंदणीकृत क्रमांक किंवा LPG आयडी किंवा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
4. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही Proceed चे बटण दाबून पेमेंट करू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)