Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?

म्हणूनच 24 कॅरेट (24 Carat Gold), 23 कॅरेट (23 Carat Gold) आणि 22 कॅरेट (22 Carat Gold) हे प्रकार पुढे आले. अनेकांना तर 24 कॅरेट, 23 कॅरेट आणि 22 कॅरेटचे सो

Pure Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोने खरेदी (Gold Purchase) ही जवळपास प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील परिचयाचीच घटना. सोने खरेदी करताना प्रत्येकालाच वाटतं आपल्याला शुद्ध सोनं (Pure Gold) मिळावं. पण गंमत अशी की शुद्ध सोनं घेतलं तर तुम्ही त्याचे काहीच करु शकत नाही. केवळ गुंतवणूक (Gold Investment) म्हणूनच तुम्ही ते खरेदी करु शकता. त्याचे दागिणे (Gold Jewelry) बनवू शकत नाही. त्यामुळे शुद्ध सोन्याची गुणवत्ता थोडीफार कमी केल्याशिवाय दागिने बनत नाहीत. म्हणूनच 24 कॅरेट (24 Carat Gold), 23 कॅरेट (23 Carat Gold) आणि 22 कॅरेट (22 Carat Gold) हे प्रकार पुढे आले. अनेकांना तर 24 कॅरेट, 23 कॅरेट आणि 22 कॅरेटचे सोने म्हणजे नेमके काय हेच माहिती नसते. याबाबत जाणून घ्या थोडक्यात

कोणत्याही सोन्यास 0 ते 24 या परिमानात मोजले जाते. या परिमानास कॅरेट म्हटले जाते. 24 कॅरेटचे सोने म्हणजे सर्वात शुद्ध मानले जाते. 24 कॅरेटचे सोने हे 99.9% इतकी गुणवत्ता दाखवते. 22 कॅरेटचे सोने हे 91% शुद्ध असते. म्हणजेच त्यात 9% इतर धातू मिसळले जातात. हे प्रामुख्याने धातू तांबे आणि झिंक असते. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून)

शुद्ध मानल्या जाणाऱ्या 24 कॅरेटच्या सोन्याचे दागिणे करायचे म्हटले तर ते फारच कठीण काम आहे. कारण शुद्ध सोने इतके मुलायम असते की या धातूपासून काहीही केले तरी ते लगेचच तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूक म्हणून जर काही करणार असाल तर 24 कॅरेटचे सोने तुम्ही खरेदी करु शकता. यातही तुम्ही केवळ बार आणि बिस्कीट इतकेच करु शकता.

शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत 22 कॅरेट सोने दागिने आणि इतर ज्वेलरी बनविण्यासाठी फायदेशीर ठरते. किंबहुना शुद्ध सोन्याला इतर धातू मिसळून काहीसे अशुद्ध म्हणजेच 22 कॅरेटचे केल्यानंतरच ते दागिणे बनविण्यालायक होते. 22 कॅरेट सोने हे 916 गोल्ड नावानेही ओळखतात. यात 91.67% सोने असते. 9% इतर धातू असतात.

23 कॅरेट गोल्डबाबत सांगयचे तर हे सोनेही उच्च शुद्धता असलेले असते. यात 95.8% सोने आणि केवळ 4.2% इतर धातू असतात. 23 कॅरेट सोन्याला 958 गोल्ड असेही म्हणतात. थायलंडसारख्या देशात 23 कॅरेट सोन्याला मागणी असते. भारतात मात्र 22 आणि 24 कॅरेट सोने बाजारात मागणीस आहे. जे लोक शुद्ध सोन्याचा आग्रह धरतात त्यांच्यासाठी 23 आणि 24 कॅरेट सोने हा चांगला ऑप्शन असू शकतो. मात्र, 22 कॅरेटच्या तुलनेत 23 आणि 24 कॅरेट सोने बरेचसे महाग असते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif