Easy Way to Keep PAN-Aadhaar Card Safe: पॅन कार्ड, आधार कार्ड सारखे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' डिजिटल पद्धतीचा करा वापर, पाहा सोप्या स्टेप्स
बँकेचे व्यवहार म्हणा, वा कोणता नवा व्यवसाय म्हणा आधारकार्ड, पॅनकार्ड अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला जर रोज आपल्यासोबत ठेवायचे असेल तर तुम्ही डिजिटल स्वरुपात त्याची प्रत तुमच्याजवळ कायम ठेवू शकता. त्यासाठी केंद्र सरकारची विशेष वेबसाइट आहे.
तुम्हाला कोणताही आर्थिक व्यवहार करायचा असेल वा नोकरीसाठीही पॅन कार्ड (PAN Card), आधारकार्ड (Aadhaar Card) तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे अनेक जण ते नेहमी आपल्या सोबत ठेवतात. मात्र रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्याकडून नकळपतणे ही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता असते. अशा वेळी ती नीट, सुरक्षित ठिकाणी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार म्हणा, वा कोणता नवा व्यवसाय म्हणा आधारकार्ड, पॅनकार्ड अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला जर रोज आपल्यासोबत ठेवायचे असेल तर तुम्ही डिजिटल (Digital Method) स्वरुपात त्याची प्रत तुमच्याजवळ कायम ठेवू शकता. त्यासाठी केंद्र सरकारची विशेष वेबसाइट आहे.
DigiLocker असे त्या संकेतस्थळाचे नाव असून तुम्ही यावर पॅन कार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट सारखी अन्य महत्त्वाची कागदपत्रे यात सेव्ह करु शकता. यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि ती तुमच्याजवळ डिजिटल स्वरुपात कायम सोबत राहतील. How To Block Your Stolen Smartphone: तुमचा चोरी गेलेला स्मार्टफोन 'या' पद्धतीने ताबडतोब करा ब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
DigiLocker चा वापर कसा कराल?
1. digilocker.gov.in वान digitallocker.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्या.
2. तिथे तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या कोप-यात Sign Up हा पर्याय दिसेल.
3. त्यावर क्लिक करुन तुमचा मोबाईल नंबर टाकून अकाउंट उघडा.
4. मोबाईल नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर OTP नंबर येईल. तो तेथे टाकून Sign Up करा.
5. त्यानंतर योग्य तो युजर आयडी आणि पासवर्ड निवडून तुमचे अकाऊंट सुरक्षित करा.
6. यानंतर DigiLocker वर तुमचे अकाउंट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही तेथे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स सेव्ह करु शकता.
7. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा DigiLocker वर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ते आधी Scan करावे लागतील. याशिवाय तुम्ही त्या डॉक्युमेंट्सचा फोटो काढूनही ते सेव्ह करु शकता.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅनकार्ड, आधारकार्ड वा अन्य महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डिजिटल पद्धतीने सेव्ह करु शकता. ज्यामुळे गरज भासल्यास हवे तेव्हा एका क्लिक द्वारे तुम्हाला ती मिळू शकतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)