e-RUPI: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लॉन्च करणार नवं डिजिटल पेमेंट सोल्युशन; पहा त्याची वैशिष्ट्यं
यामध्ये State Bank of Inia, HDFC, Axis, Punjab National Bank, Bank of Baroda, Canara Bank, IndusInd Bank, ICICI Bank यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज नवं कॅशलेस पेमेंट सोल्युशन e-RUPI लॉन्च करणार आहेत. यामध्ये e-vouchers च्या माध्यमातून व्यवहार केले जाणार आहेत. ही यंत्रणा National Payments Corporation of India कडून विकसित करण्यात आली आहे. यामध्ये Department of financial services, health ministry आणि National Health Authority यांची देखील मदत घेण्यात आली आहे.
e-RUPI ही वाऊचर्स ही ई गिफ्ट कार्ड स्वरूपातील आहे. तसेच ती प्री पेड आहेत. या वाऊचर्सचा कोड एसएमएस द्वारा देखील शेअर केली जाऊ शकतात. ही ई व्हाऊचर्स एखादी व्यक्ती किंवा विशिष्ट कारणासाठी असू शकतात. म्हणजेच जर एखादे e-RUPI voucher हे Covid-19 vaccine साठी असेल तर त्याचा वापर केवळ लसीकरणात केला जाऊ शकतो.
E-RUPI हे कोणतेही प्लॅटफॉर्म नाही तर ते व्हाऊचर विशिष्ट सर्व्हिस साठी आहे. E-RUPI वापरताना तुमचं बॅंक अकाऊंट नसेल, तुमच्याकडे डिजिटल पेमेंट अॅप, स्मार्टफोन नसेल तरीही वापर केला जाऊ शकतो. ही वाऊचर्स प्रामुख्याने आरोग्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांसाठी केला जाणार आहे. कॉर्पोर्ट्स कडून त्यांच्या कर्मचार्यांना ही वाऊचर्स दिली जाऊ शकतात. केंद्राने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार कोविड 19 लसीकरणामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये लसीकरणासाठी ही वाऊचर्स गिफ्ट्सच्या स्वरूपात दिली जाऊ शकतात.
दरम्यान जी व्यक्ती हे वाऊचर घेऊन इतरांना देणार आहे त्याच्या वापरावर देखील ट्रॅकिंग ठेवले जाणार आहे. यामध्ये कार्ड किंवा त्याची हार्ड कॉपी रिडीम साठी गरजेचे नाही. केवळ क्यु आर कोड देखील मेसेज द्वारा शेअर केला जाऊ शकतो.
National Health Authority च्या माहितीनुसार, e-RUPI सध्या 8 बॅंकांसोबत उपलब्ध आहेत. यामध्ये State Bank of Inia, HDFC, Axis, Punjab National Bank, Bank of Baroda, Canara Bank, IndusInd Bank, ICICI Bank यांचा समावेश आहे.