Lok Sabha Elections 2019 मतदान व मतमोजणी मुळे मुंबई, गोवा, दिल्ली, बंगळुरू मध्ये कोण कोणत्या दिवशी Dry Day?
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल तसेच दुकानाचे लायसन्स रद्द केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
April-May 2019 Dry Day List: देशासह महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धूम सुरु आहे. कुठे उमेदवारी अर्ज भरायची धावपळ आहे तर काही ठिकाणी राजकीय पक्ष अजूनही उमेदवार ठरवण्यासाठी चर्चा करत आहे. मात्र लोकसभा निवडणूक भयमुक्त आणि सुरक्षित वातावरणात पार पाडावी म्हणून मतदानापूर्वी 48 तास ते मतदान संपेपर्यंत म्हणजे मतदानादिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 'ड्राय डे' (Dry Day) पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात देशी, विदेशी दारू, मद्य सदृश्य पदार्थ, ताडी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदानासोबतच (Voting Day) मतमोजणी (Counting Day) आणि एप्रिल, मे महिन्यात येणाऱ्या इतर सणामुळे 'ड्राय डे ब्लॉक' आहे. लोकसभा निवडणुक 2019, राम नवमी, महाराष्ट्र दिन आणि मतमोजणी यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सह महाराष्ट्रात एपिल-मे महिन्यात 5-7 दिवस ड्राय डे; पहा संपूर्ण यादी
भारतामध्ये कोणत्या राज्यात कधी ड्राय डे?
दिल्ली ड्राय डे
10 मे , शुक्रवार: संध्याकाळी सहा वाजल्यापासून
11 मे, शनिवार: संपूर्ण दिवस
12 मे, रविवार: संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
बंगळुरू ड्राय डे
16 एप्रिल, मंगळवार: संध्याकाळी सहा वाजल्यापासून
17 एप्रिल, बुधवार: संपूर्ण दिवस
18 एप्रिल, गुरुवार: संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
23 मे 2019, गुरूवार: मतमोजणी
मुंबई आणि ठाणे ड्राय डे
27 एप्रिल 2019, शनिवार - संध्याकाळी सहा वाजल्यापासून
28 एप्रिल 2019, रविवार - संपूर्ण दिवस
29 एप्रिल 2019, सोमवार - संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
1 मे 2019, बुधवार- महाराष्ट्र दिन
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
हैदराबाद ड्राय डे
9 एप्रिल, मंगळवार: संध्याकाळी सहा वाजल्यापासून
10 एप्रिल, बुधवार: संपूर्ण दिवस
11 एप्रिल, गुरूवार: संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
गोवा ड्राय डे
21 एप्रिल, रविवार: संध्याकाळी सहा वाजल्यापासून
22 एप्रिल, सोमवार: संपूर्ण दिवस
23 एप्रिल, मंगळवार: संध्याकाळी सहा वाजेपर्यंत (मतदान दिवस)
23 मे 2019, गुरूवार - मतमोजणी
ड्राय डे लिस्ट 2019
निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या दिवसात दारूची दुकानं बंद ठेवणं अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल तसेच दुकानाचे लायसन्स रद्द केले जाईल असे सांगण्यात आले आहे.