Drone Policy ते SBI च नवं YoNo App, पहा 1 डिसेंबरपासून कोणत्या सोयी, नियमांमध्ये झाले बदल

या बदलांची वेळीच माहिती करून घेतल्यास गैरसोय टाळण्यास मदत होईल.

Representational Image | (Photo Credits: Unsplash.com)

खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस डिजिटलायझेशन वाढत आहे. त्यामुळे आता अनेक काम आता घरबसल्या एका क्लिकवर करणं शक्य होत आहे. मात्र त्यासोबतच काही सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार बदलही केले जातात. म्हणूनच सामान्यांच्या जीवनात असेच बदल आणणाऱ्या गोष्टींकडे 1  डिसेंबरपासून मोठे बदल होत आहेत. या बदलांची वेळीच माहिती करून घेतल्यास गैरसोय टाळण्यास मदत होईल.

SBI च नवं YoNo App

SBI ने SBI Buddy App बंद करून ग्राहकांसाठी आता नव अॅप बाजारात आणलं आहे. आजपासून ग्राहकांना या YoNo अॅपच्या मदतीने ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवहार करण्याची सोय देण्यात आली आहे.

SBI Netbanking बंद 

RBI च्या धोरणानुसार मोबाईल क्रमांक अकाउंट सोबत लिंक करणं अनिवार्य आहे. त्यामुळे तुमच्या अकाऊंटला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर तर SBI Netbanking ची सुविधा आजपासून ब्लॉक करण्यात आली असेल.

ड्रोनचा वापर कायदेशीर

1 डिसेंबरपासून देशात ड्रोनच्या वापर करण्याला कायदेशीर परवानगी आहे. नागरी हवाई मंत्रालयाने या संदर्भातील धोरण तयार केले असुन त्यानुसार ड्रोनच्या मालकांना नोंदणी करावी लागणार आहे. अॅप, वेबसाईट मदतीने डिजिटल परमिट देण्यात येईल त्यानंतरच ड्रोन उडवता येईल.

तेजस’, ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेसच्या  वेळांमध्ये बदल 

कोकण रेल्वेवर धावणाऱ्या सुपरफास्ट ट्रेन ‘तेजस’, ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेसच्या  वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे बदल 2 डिसेंबरपासून  होतील. तेजस एक्स्प्रेस ( २२११९)  छत्रपती CSMT हून पहाटे 5 ऐवजी 5.50 वाजता सुटेल. करमाळीहून  दुपारी 2.30 ऐवजी  2.40 वाजता सुटेल. जनशताब्दी’ एक्स्प्रेसच्या परतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी मडगावहून दुपारी 2.30 ऐवजी 2.40 वाजता सुटेल. Pune - Singapore Direct Flight : आजपासून पुणेकरांना Jet Airways ची थेट सिंगापूर स्वारी, पहा तिकिटांची खास सवलत

IIT मध्ये   प्लेसमेंट सीझन

आयआयटी मुंबई, मद्रासमध्ये आजपासून रोजगारसंधी निर्माण होणार आहेत. कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात 326 कंपन्यांनी 490  नोकऱ्यांसाठी नोंदणी केली आहे. हा IIT Madras प्लेसमेंट सिझन 1-8 डिसेंबर 2018 चालणार आहे.

अनेक गोष्टींची वेळीच माहिती नसल्याने त्याबाबतीत अनेकदा आर्थिक भुर्दंड बसतो. म्हणून आजपासून बदलणाऱ्या या गोष्टी  नक्की लक्षात ठेवा.