Debit Card, Credit Card Tokenisation: सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी क्रेडिट,डेबिट कार्ड्स टोकनाईज्ड करण्याची अंतिम मुदत पुढील महिन्यापर्यंतच; इथे पहा सारी माहिती

ऑनलाइन फ्रॉड करणार्‍यांना यामुळे ग्राहकांच्या कार्ड्सचे तपशील दिसणार नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका वाचू शकतो.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pxfuel)

डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आरबीआयच्या नव्या नियमावलीनुसार, ऑनलाईन सुरक्षित व्यवहारांसाठी ते युनिक टोकन सोबत रिप्लेस केले जाणार आहेत. यासाठी 30 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. जुलै 2022 ची असलेली अंतिम मुदत आता वाढवून सप्टेंबर 30 करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यापर्यंतच तुम्हांला तुमची क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड्स टोकनाईज्ड करण्याची संधी आहे.

आरबीआय कडून जशी अंतिम तारीख वाढवण्यात आली तशी नोटिफिकेशन पाठवून ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी त्यांची क्रेडीट आणि डेबिट कार्ड्स कशी टोकनाईज्ड करायची आहेत त्याची माहिती देणारं ट्वीटही शेअर केले आहे.

टोकनायाझेशन म्हणजे काय?

आरबीआयच्या माहितीनुसार, टोकनायझेशनच्या माध्यमातून कार्डसचे तपशील एका पर्यायी कोड ने बदलले जाणार आहेत. त्याला 'टोकन' म्हटले जाते. यामध्ये मर्चंट्स आणि पेमेंट अ‍ॅग्रिगेटर्सना क्रेडिट, डेबिट कार्डचे तपशील हटवावे लागणार आहेत. त्याच्या ऐवजी नवा टोकन असेल.

टोकनायझेशनचे फायदे काय?

आरबीआयच्या माहितीनुसार टोकनायझेशन मुळे ग्राहकांचे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित होतील. ऑनलाइन फ्रॉड करणार्‍यांना यामुळे ग्राहकांच्या कार्ड्सचे तपशील दिसणार नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका वाचू शकतो. नक्की वाचा: Cyber Crime: आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डची ऑफर देत मुंबईतील व्यावसायिकाला घातला 4.20 लाखांचां गंडा .

Debit Card, Credit Card टोकनाईज्ड कसे कराल?