ELI Scheme चा फायदा घेण्यासाठी EPFO ने UAN activation आणि Aadhaar सोबत बॅंक अकाऊंट लिंक करण्याला दिली 15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
Union Budget 2024-25 मध्ये घोषित करण्यात आलेल्या ELI scheme चा फायदा घेण्यासाठी UAN activation आणि Aadhaar seeding आवश्यक आहे.
EPFO कडून UAN Activation आणि seeding of bank accounts to Aadhaar यासाठी अंतिम मुदत वाढवली आहे. Employment Linked Incentive स्कीमचा फायदा घेण्यासाठी या डेडलाईनला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 15 जानेवारी 2025 पर्यंत नोकरदार मंडळी ही लिकिंगची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यापूर्वी 15 डिसेंबर असलेल्या डेडलाईनला महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
UAN activation काय आहे?
EPFO services ऑनलाईन मिळवण्यासाठी universal account number अॅक्टिव्हेट करणं आवश्यक आहे. universal account number हा 12 अंकी असतो. हा नंबर काम करत असलेल्या कंपनीकडून कर्मचार्यांना दिला जातो. Activating UAN हे कोणत्याही ईपीएफ निगडीत सर्व्हिसेस साठी आवश्यक आहे. याद्वारा ऑनलाईन माध्यमातून पीएफ काढता येतो, पीएफ बॅलन्स तपासता येतो, कॉन्टॅक्ट अपडेट करता येतो. EPFO Withdrawal For Marriage: EPF सदस्य लग्नासाठी सहज काढू शकता शिल्लक रक्कम, जाणून घ्या, काय आहेत अटी .
Aadhaar सोबत Seeding of bank account म्हणजे काय?
बॅंक अकाऊंट हे आधार सोबत लिंक असणं देखील गरजेचे आहे. यामुळे पीएफ अकाऊंट मधून जेव्हा पैसे काढले जातील तेव्हा ते थेट बॅक अकाऊंट मध्ये येतील. direct benefit transfer (DBT) scheme चा जेव्हा फायदा घेतला जाईल तेव्हा बॅंक अकाऊंट आधार सोबत सीड असणं आवश्यक आहे.
Employment-linked incentive scheme
EPFO ने higher wages वरील पेन्शनसाठी वेतन तपशील सादर करण्याची अंतिम तारीख पुढील वर्षी 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
अलीकडेच, EPFO ने कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) दाव्याची रक्कम थेट ई-वॉलेट्सद्वारे ऍक्सेस करण्याची परवानगी देण्याची योजना जाहीर केली आहे. सध्या, कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफ निधी ऑनलाइन प्राप्त करण्यासाठी EPFO पोर्टलवर अवलंबून राहावे लागते. सेटल केलेले पैसे 7-10 दिवसांच्या आत लिंक केलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात, त्यानंतर एटीएम किंवा बँकेद्वारे पैसे काढले जाऊ शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)