7th Pay Commission: जुलैपासून वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA; पगारात होणार 'इतकी' वाढ, वाचा सविस्तर

महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees) सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या आकडेवारीच्या आधारे जुलैमध्ये भत्त्यात वाढ होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. एप्रिल 2022 मध्ये जाहीर झालेल्या AICPI निर्देशांकाच्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, महागाई भत्त्यात (DA वाढ) किमान 4% वाढ होईल. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये वेगाने वाढलेल्या निर्देशांकाने सूचित केले आहे की, डीएमध्ये 5% वाढ होऊ शकते. तथापि, मे 2022 च्या डेटाच्या आधारे 4 टक्क्यांहून अधिक निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, मार्चच्या तुलनेत एप्रिलच्या एआयसीपीआय निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. एआयसीपीआय निर्देशांक एप्रिल 2022 मध्ये 127.7 पर्यंत वाढले जे मार्चमध्ये 126 इतके होते. मार्चमध्ये महागाईचा आकडा 126 आणि फेब्रुवारीमध्ये 125 होता. फेब्रुवारीच्या तुलनेत एप्रिलपर्यंत निर्देशांकात 2.7 अंकांची वाढ झाली आहे. याच आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA Hike news) वाढतो. त्यात वाढ केल्यावर महागाई भत्ताही वाढतो. (हेही वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लान)

'इतका' असेल महागाई भत्ता -

जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता मार्चमध्ये वाढवण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यावेळी सरकारने महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला होता. यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याचीही चर्चा होती. आता डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास महागाई भत्ता 38 टक्के होईल. या बदलानंतर पगारात बंपर वाढ होणार आहे. त्यामुळे पगारात काय फरक पडेल? ते जाणून घेऊयात...

किमान मूळ वेतन असलेल्यांना किती फायदा होणार?

कर्मचाऱ्याचे मूळ वेतन रु. 18,000

विद्यमान महागाई भत्ता (34%) रु.6120 प्रति महिना

नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840 प्रति महिना

महागाई भत्त्यात वाढ 6840- 6120 = रु.720 प्रति महिना

वार्षिक किती नफा 720X12 = रु 8640

जास्तीत जास्त बेसिक असलेल्यांना किती फायदा मिळणार?

कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु 56900

विद्यमान महागाई भत्ता (34%) 19346 रुपये प्रति महिना

नवीन महागाई भत्ता (38%) 21622 रुपये प्रति महिना

महागाई भत्त्यात वाढ 21622-19346 = रु. 2276 प्रति महिना

वार्षिक किती नफा 2276 X12 = रु 27,312

तथापी, केंद्र सरकार जुलैनंतर पुढील महागाई भत्ता जाहीर करेल. मात्र, त्याची थकबाकी जुलैपासून मिळणार आहे. AICPI निर्देशांकावरून अंदाज लावला जातो की, DA मध्ये किती वाढ होईल? AICPI निर्देशांक फेब्रुवारीपासून सातत्याने वाढत आहे. तो जानेवारीत 125.1 होता, तो फेब्रुवारीत 125 वर आला. यानंतर मार्चमध्ये ते 126 आणि एप्रिलमध्ये 127.1 इतके वाढले. AICPI डेटा दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे जारी केला जातो.