Amphan, Nisarga, Arnab चक्रिवादळाला नावं कसं मिळतं? पहा IMD ने जारी केलेल्या 169 नावांची संपूर्ण यादी!

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये तयार होणार्‍या चक्रीवादळांना नाव देण्यासाठी भारत, बांग्लादेश, ईराण, मालदीव्स, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युएई, येमेन अशा 13 देशांचा एक गट काम करतो.

चक्रीवादळ्। प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या काही दिवसामध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर 'निसर्ग' (Nisarga) चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व किनारपट्टीला 'अम्फान'मुळे झालेलं नुकसान पाहता आता महराष्ट्र, गोवा, गुजरात, केरळ या पश्चिम किनारपट्टीवर असणार्‍या राज्यांना सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक गहरा झाल्याने आता या 3 जूनच्या रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम गुजरातच्या दिशेने हा पुढे सरकण्याची शक्यता आहे. अद्याप चक्रिवादळाची घोषणा झाली नसली तरीही पुढील 12 तासामध्ये हा पट्टा अधिक कमी होऊन 24 तासांत त्याची चक्रीवादळामध्ये निर्मिती होऊ शकते. असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि हे चक्रीवादळ 'निसर्ग' म्हणून ओळखलं जाईल. पण तुम्हांला ठाऊक आहे का? या चक्रीवादळाचीनावं कशी ठरतात? कोण ठरवतं? आणि त्याचे नियम काय असतात? Nisarga Cyclone: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 129 वर्षांनंतर जून महिन्यात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने भारतीय हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा.

भारतीय हवामान खात्याने एप्रिल 2020 मध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये अर्णब(Arnab),निसर्ग (Nisarga),आग (Aag), व्योम (Vyom), अझर (Azar),पिंकू (Pinku), तेज (Tej), गति (Gati), लुलू (Lulu)अशी चक्रीवादळांच्या नावांची यादी आहे. जगामध्ये 6 RSMC काम करतात त्यापैकी एकामध्ये भारताचा समावेश आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये तयार होणार्‍या चक्रीवादळांना नाव देण्यासाठी भारत, बांग्लादेश, ईराण, मालदीव्स, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युएई, येमेन अशा 13 देशांचा एक गट काम करतो.

13 देशांकडून 13 वादळांच्या नावाची यादी तयार करून घेतली जाते. अशाप्रकारे 169 चक्रीवादळांची यादी तयार होते. इथे पहा चक्रीवादळांच्या 169 नावांची यादी !

13 देशांच्या गटाकडून नावं ठरवण्यासाठी नियमावली काय?

भारतात दिल्लीमध्ये असणार्‍या Regional Specialised Meteorological Centre (RSMC) कडून North Indian Ocean सोबत पूर्व, पश्चिम किनारपट्टीवरील वादळांचीनावं दिली जातात. दरम्यान हवेचा वेग 34 knots म्हणजेच 62 kmph किंवा त्यापेक्षा अधिक असेल तेव्हाच सायक्लोनला त्याचं नाव दिलं जातं.

दरम्यान आता 129 वर्षानंतर महाराष्ट्राला धडकण्याची शक्यता असणार्‍या निसर्ग या चक्रीवादळाचं नाव बांग्लादेश कडून सुचवण्यात आलं आहे. 2004 साली जारी केलेल्या यादीमधील शेवटचं नाव अम्फान मागील आठवड्यात आलेल्या वादळाला वापरण्यात आलं आहे. ते थायलंडकडून सूचवण्यात आलं होतं. तर 'निसर्ग' नंतर येणारं वादळ गति असेल हे नाव भारताच्या यादीमधील आहे.