Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन ब्लॉकचेन आदी गुंतवणूक किती सुरक्षीत? खरोखरच सुरक्षीत असतो आपला पैसा?
क्रिप्टोकरन्सी हा एक नवाच प्रकार पाठिमागील काही वर्षांमध्ये उदयास आला आहे. काही लोक याला बिटकॉईन गुंतवणूक (Bitcoin Investment) असेही म्हणतात. अनेक देशांमध्ये बिटकॉईन (Bitcoin) आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency ) या प्रकाराला अधिकृत मान्यता देण्यात आली असली तरी भारतात आणि भारताप्रमाणेच अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी प्रकाराला अधिकृत व्यवहारांचा दर्जा देण्यात आला नाही.
Cryptocurrency Bitcoin Blockchain: आर्थिक क्षेत्रात अलिकडील काळात अनेक बदल पाहायला मिळत आहे. नवनवे प्रवाह अर्थकारणात येऊ लागले आहेत. त्यामुळे सहाजिकच गुंतवणुकीचे मार्गही बदलले आहेत. अशात क्रिप्टोकरन्सी हा एक नवाच प्रकार पाठिमागील काही वर्षांमध्ये उदयास आला आहे. काही लोक याला बिटकॉईन गुंतवणूक (Bitcoin Investment) असेही म्हणतात. अनेक देशांमध्ये बिटकॉईन (Bitcoin) आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency ) या प्रकाराला अधिकृत मान्यता देण्यात आली असली तरी भारतात आणि भारताप्रमाणेच अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी प्रकाराला अधिकृत व्यवहारांचा दर्जा देण्यात आला नाही. सुरुवातीच्या काळात अनेक अधिकृत असलेल्या सरकारी संस्था, कंपन्या तसेज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले जबाबदार लोक क्रिप्टोकरन्सी या प्रकाराला आपण गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत असत. पण अलिकडे ते लोकही आपण क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी खरोखरच सुरक्षीत आहे का? बिटकॉईन ब्लॉकचेन (Bitcoin Blockchain) प्रकारात गुंतवलेला आपला पैसा खरोखरच सुरक्षीत असतो का? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. या प्रश्नांचाच घेतलेला हा मागोवा.
क्रिप्टोकरन्सी प्रकारातील महत्त्वाचा घटक असलेला बिटकॉईन हा 2009 मध्ये लॉन्च झाला. आजच्या काळातील क्रिप्टोकरन्सी विश्वात बिटकॉईन हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. ज्याचा संपूर्ण व्यवहार ब्लॉकचेन टेक्नोलॉजी (Blockchain Technology) प्रणालीवर चालतो. त्यामुळे बिटकॉईनमध्ये गुंतवणूकच नव्हे तर त्याच्या तंत्रज्ञान प्रकारावरही मोठ्या प्रमाणावरे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. या प्रश्नाबाबत सांगायचे तर टेक्नॉलॉजी ही आपल्या अत्यंत अजोड अशा सुरक्षेसाठी ओळखली जाते. ब्लॉकचेन डिजिटल मनी ट्रांजॅक्शन साठी एक प्लॅटफॉर्मच्या रुपात बिटकॉईन आणि इथीरिएम यांसारखी क्रिप्टोकरन्सी संबंधीत आहे. हा एक जगभरातील सर्व क्रिप्टोकरन्सी ट्रांजॅक्शनचा डेटाबेस आहे.
दरम्यान, टेक्नॉलॉजीचा उपयोग मेडिकल रेकॉर्ड सारख्या डेटा स्टोर करण्यासाठीही केला जातो. जगभरात हे तंत्रज्ञान अधिक अद्ययावत आणि निर्धोक म्हणून ओळखले जाते. हे तंत्रज्ञान म्हणजे एक अशा प्रकारचे खातेबुक आहे जे डिजिटल आहे आणि सर्वांसाठी खुले आहे. ट्रांजॅक्शन करण्याचा हा एक सुरक्षीत प्लॅटफॉर्म आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून करण्यात आलेले सर्व व्यवहार हे रेकॉर्ड केले जातात आणि ब्लॉक वर डेटा रुपात ते ठेवले जातात. ही सर्व माहिती टाईम-स्टॅम्प्ड असते. (हेही वाचा, Cryptocurrency Blockchain Nodes: क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन नोड कसे काम करते? जाणून घ्या नेटवर्कविषयी)
ब्लॉकचेन टेक्नोलॉजी किती सुरक्षीत?
ब्लॉकचेन टेक्नोलॉजी सुरक्षेबाबतही अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आढळते. पण ही प्रणाली देखील सुरक्षीत असते. तसेच, यावर खूप सारे ब्लॉक एक श्रृंखलाच असते जा डेटा स्टोर केली जाते. प्रत्येक ब्लॉमध्ये एक यूनीक हॅश नंबर आणि एक लिंक असते. जी याच्यापाठी ब्लॉकला जोडते. प्रत्येक ब्लॉकची क्रमवारी ही एक महत्त्वपूर्ण घटक असते. जी बदलली जात नाही. तसेच बदलताही येत नाही. त्यामुळे त्यामुळे ती अधिक सुरक्षित मानली जाते.
महत्त्वाची टीप: वरील माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन अथवा तत्सम प्रकारच्या गुंतवणुकीबाबत सुरक्षेची कोणतीही हमी लेटेस्टली मराठी देत अथवा घेत नाही. वाचकांनी ही माहिती वाचल्यावर स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना त्यातील जोखीम, फायदा-तोटा सुरक्षीतता याचा अभ्यास करुन व तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)