Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून
क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum मध्ये गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही ही करन्सी खरेदी करु इच्छित असाल तर आगोदर काही गोष्टींची माहिती जरुर घ्या. क्रिप्टोकरन्सी ही एक अभासी करन्सी म्हणजेच व्हर्चुअल करन्सी (Virtual Currency) आहे. त्यामुळे तिला स्पर्ष करता येत नाही. ती स्वतंत्रपणे पाहता येत नाही. केवळ ती आहे असे समजून व्यवहार करावे लागतात.
क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) अद्यापही भारतात अधिकृतपणे स्वीकारली गेली नाही. हे खरे असले तरी यात गुंतवणूक करणारांची संख्या कमी नाही. बिटकॉईन (Bitcoin), अथवा इथर (Ethereum) यासारख्या करन्सी खरेदी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढते आहे. क्रिप्टोकरन्सी ही एक अभासी करन्सी म्हणजेच व्हर्चुअल करन्सी (Virtual Currency) आहे. त्यामुळे तिला स्पर्ष करता येत नाही. ती स्वतंत्रपणे पाहता येत नाही. केवळ ती आहे असे समजून व्यवहार करावे लागतात. भारत सरकार अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारेही या करन्सीबाबत अद्यापतरी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. दरम्यान, या करन्सीत गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही ही करन्सी खरेदी करु इच्छित असाल तर आगोदर काही गोष्टींची माहिती जरुर घ्या.
क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यापूर्वी काय जाणून घ्याल?
- व्हर्च्युअल करन्सी खरेदी करणयासाठी आपल्याला प्रथम एक अकाऊंट उघडावे लागेल. जे आपण क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज (Cryptocurrency Exchange) द्वारा उखडू शकता. भारतात आजघडीला अनेक वेगवेगळी Cryptocurrency Exchange उपलब्ध आहेत. यावर थोडा अभ्यास करुन आपण आपल्याला हवी ती क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज खरेदी करुन आपले व्यवहार (खरेदी विक्री) सुरु करु शकता. (हेही वाचा, Cryptocurrency: Bitcoin नंतर Ether गाठतय उच्चांक, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवा विक्रम)
- Cryptocurrency Exchange खरेदी करताना शक्यतो अशीच एक्चेंज निवडा जी भारतात नोंदणीकृत आहे. जिचे कार्यालय भारतातच आहे. तसेच, ही एक्स्चेंज आपली KYC व्हेरीपीकेशन मागेल. शक्यतो अशीच एक्सचेंज निवडा जी सुरक्षा आणि नियमांचे पालन करेन.
- एक्चेंज सांगते की, कोणत्या क्रिप्टोकरन्सीत डीलिंग आणि ट्रँज्येक्शन होते. त्यामुळे अकाऊंट उघडण्यापूर्वी हे जरुर पाहा की तुम्ही ज्या करन्सीत गुंतवणूक करु इच्छिता त्यासोबत ही एक्सचेंज डील करते किंवा नाही. अकाऊंट उघडल्यावर केवायसी प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपण आपली खरेदी विक्री सुरु करु शकता.
- आपणास क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यापूर्वी एक्सचेंजवर पेमेंट मेथडमध्ये आपली बँक अकाऊंट लिंक करावे लागेल. जिथे क्रिप्टोकरन्सी खरेदी केल्यावर पैसे कटतील. त्यानंतर आपल्याला ऑर्डर द्यावी लागेल. आपल्याला जी करन्सी खरेदी करायची आहे. जितकी खरेदी करायची आहे. हे सर्व सांगावे लागेल. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, ऑर्डर फायनल केल्यानंर आगोद सर्व गोष्टी काळजीपूर्व वाचाव्या लागतील. कोणताही ऑप्शन घाईघाईत क्लि करु नये. आपल्या ऑर्डरचा प्रिव्ह्यू स्क्रीनवर दिसेल. तो अत्यंत काळजीपूर्वक पाहा.
- आपण जी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत आहात त्याची बाजारातील किंमत तपासा. ट्रेंडिंगमध्ये तो कशी कामगिरी करतो आहे तेही पाहा. ही सर्व माहिती पाहिल्यावरच 'Buy' ऑप्शनवर क्लिक करा. कारण बिटकॉईनमध्ये अत्यंत चढ उतार होत राहतात.
स्टोअर कुठे कराल ?
क्रिप्टोकरन्सी खरेदी केल्यावर ती काळजीपूर्वक स्टोरही करावी लागते. त्यासाठी आपल्याला एक क्रिप्टो वॉलेट मिळते. अनेकदा खूपसारी एक्चेंज त्यांचेच फ्लॅटफॉर्म स्टोरेज सुविधा देत असते. पण तुम्ही तुमची करन्सी क्रिप्टो वॉलेटमध्ये स्टोर करणे केव्हाही चांगले.खास करुन क्लोड क्रिप्टो वॉलेट मध्ये. कारण हॉट क्रिप्टो वॉलेट हे नेहमी ऑनलाईन असते. त्यामुळे कोल्ड वॉलेटच्या तुलनेत ते तितके सुरक्षीत नसते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)