Coronavirus: भारताच्या 'या' राज्य, केंद्रशासित प्रदेशात आजवर कोरोनामुळे नाही झाला एकही मृत्यू, रुग्णांची संख्याही नियंत्रणात, पाहा संपूर्ण यादी

तथापि, देशात अशी 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यात प्राणघातक व्हायरसचा कमीत कमी परिणाम झाला असून अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. यापैकी काही राज्यांमध्ये 500 पेक्षा कमी प्रकरणे आहेत.

Coronavirus in India (Photo Credits: Pixabay)

5 लाख 29 हजारहून अधिक संक्रमित आणि 16,095 हुन अधिक मृत्यूसह कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण भारतात (India) कहर केला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली ही सर्वाधिक प्रभावित राज्ये आहेत कारण येथे एकूण 85 टक्के लोकांना या घातक व्हायरसचे संक्रमण झाले आहे. देशातील सर्वाधिक नुकसान झालेल्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून रुग्णांचा आकडा एक लाखांचा टप्पा ओलांडूला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) 1,59,133 कोरोनारुग्ण तर 7,273 मृत्यूची नोंद झाली आहे. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) 80,188 प्रकरणे आणि 2,558 मृत्यूची नोंद झाली आहे. तथापि, देशात अशी 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यात प्राणघातक व्हायरसचा कमीत कमी परिणाम झाला असून अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. यापैकी काही राज्यांमध्ये 500 पेक्षा कमी प्रकरणे आहेत आणि त्यापैकी बहुतेक आतापर्यंत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. (Coronavirus Lockdown: कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटात 'या' राज्यांनी वाढवला लॉकडाऊन, येथे पाहा संपूर्ण लिस्ट)

येथे आम्ही अशा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

मणिपूर: या ईशान्य राज्यात एकूण कोविडचे 1092 प्रकरणे आहेत. यामध्ये 432 विषाणूमुळे बरे झालेल्यालोकांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नागालँड: नागालँडमध्ये एकूण 387 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असूमी 432 बरे झाले आहेत.

मिझोरम: या राज्यात एकूण 148 रुग्ण आढळले असून एकही मृत्यू न होता 55 रुग्ण बरे झाले आहेत.

सिक्कीम: शहरात कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली असून एकूण 87 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 46 या व्हायरसच्या संसर्गापासून मुक्त झाले आहे.

अंदमान निकोबार बेट: इथे सर्वात कमी 72 रुग्ण आढळून आले आहेत आणि यापैकी 43कोरोनमुक्त झाले आहेत.

दादरा आणि नगर हवेली: इथे 177 रुग्णांपैकी 55 जण कोरोनमुक्त झाले आहेत.

लक्षद्वीप: इथे एकही कोरोनारुग्ण आढळला नाही.

दुसरीकडे, भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. राज्यात काल (27 जून) दिवसभरात 5318 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 67 हजार 600 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. यानुसार सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 59 हजार 133 इतका आहे.