Coronavirus Lockdown: कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटात 'या' राज्यांनी वाढवला लॉकडाऊन, येथे पाहा संपूर्ण लिस्ट

भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. येथे आम्ही अशा सर्व राज्यांविषयी सांगणार आहोत ज्यांनी लॉकडाऊन वाढवला आहे.

Lockdown in India | File Image | (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग तीव्र वेगाने पसरत आहे. भारतात कोरोनाच्या संसर्गाचे (India Coronavirus) प्रमाण पाच लाखांच्या पुढे गेले आहे. शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे 5,08,953 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी 1,97,387 सक्रिय प्रकरणे आहेत तर 2,95,881 लोक कोरोनाहून बरे झाले आहेत. देशात आजवर कोरोना संक्रमणामुळे 15,685 मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रकरणांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये (Lockdown) शिथिलता देण्यात आली आहे, तर काही राज्यांनी कोरोना संकट लक्षात घेत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच, या प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढविले आहे किंवा काही भागात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. (Lockdown In Navi Mumbai: नवी मुंबई येथील कंटनमेंट झोनसाठी 8 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर)

येथे आम्ही अशा सर्व राज्यांविषयी सांगणार आहोत ज्यांनी लॉकडाऊन वाढवला आहे. आपल्या राज्यात कोरोना संक्रमणाबद्दल पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

झारखंड: झारखंड सरकारने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी शुक्रवारी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. शाळा आणि धार्मिक स्थळे या दरम्यान बंद राहतील. झारखंडमध्ये आजवर 2,290 कोरोना रुग्ण तर 12 मृत्यूची नोंद झाली आहे.

पश्चिम बंगाल: तृणमूल कॉंग्रेसच्या नेतृत्वात पश्चिम बंगाल सरकारने काल घोषणा केली की राज्यात सक्तीने कोरोना व्हायरस लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात येईल. विस्तारित कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान रात्रीच्या कर्फ्यूच्या वेळेत सुधारणा करण्यात आली असून ते रात्री 10 ते पहाटे 5 दरम्यान लागू राहील.

आसाम: आसाम सरकारने राज्यभरात 12 तास रात्र कर्फ्यू आणि 28 जून मध्यरात्रीपासून गुवाहाटी शहर असलेल्या कामरूप (मेट्रो) जिल्ह्यात 14 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन जाहीर केला आहे. संध्याकाळी 7 वाजेपासून 12 तासांचा कर्फ्यू राज्यभर पाळला जाईल. 27 जूनपासून आठवड्याच्या शेवटी इतर शहरांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये संपूर्ण लॉकडाउन लागू केले जाईल.

तामिळनाडू: गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या तामिळनाडू सरकारने चेन्नईसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ‘अधिकतम प्रतिबंधित लॉकडाउन’ जाहीर केले होते. यात दोन रविवारी पूर्ण प्रमाणात शटडाऊन देखील समाविष्ट आहे, असे सरकारने नमूद केले होते. काल, तामिळनाडूमध्ये 3,645. नवीन रुग्ण आढळले जे दिवसातले सर्वात जास्त प्रकरण असून एकूण रुग्णांची संख्या 74,622 इतकी असल्याचे आरोग्य विभागाच्या बुलेटिनने म्हटले आहे.

दिल्ली: राजधानीत लॉकडाऊन वाढले नसले तरी, दिल्ली सरकारने 31 जुलै पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केले.

तेलंगणा: हैदराबादमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या तीव्रतेमुळे अनेक दुकाने, व्यवसायिक संस्था आणि बाजारपेठा यांनी 7 ते 10 दिवसांच्या कालावधीत स्वयंसेवी लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद किराना मर्चंट्स असोसिएशनने शहरातील सर्वात मोठा बेगम बाजार 28 जूनपासून 5 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चारमीनारच्या सभोवतालची कायमच कोंडी करणारी बाजारपेठही बंद आहे.

दरम्यान, 1 जून ते 26 जून दरम्यान देशात 2,99,866 रुग्णांची नोंद झाली आहे. रिकव्हरी रेटही 58.24 टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif