CBSE Recruitment 2025: सीबीएसई मध्ये 212 जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी; cbse.gov.in वर करा अर्ज

142 Superintendent posts आणि 70 Junior Assistant च्या जागांसाठी नोकरभरती सुरू आहे.

CBSE Recruitment 2025: सीबीएसई मध्ये 212 जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत   31 जानेवारी; cbse.gov.in वर करा अर्ज
Online | Pixabay.com

Central Board of Secondary Education अर्थात सीबीएससी कडून Superintendent आणि Assistant पदासाठी नोकरभरती सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 31 जानेवारी 2025 हा शेवटचा दिवस आहे. cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट वर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये 142 Superintendent posts आणि 70 Junior Assistant च्या जागा आहेत.

CBSE Recruitment 2025 साठी पात्रता निकष काय आहेत?

शैक्षणिक पात्रता -

Superintendent पदासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचं शिक्षण किमान पदवी असणं आवश्यक आहे. तर Junior Assistant साठी अर्ज करण्याचे किमान शिक्षण 12वी असणं आवश्यक आहे. अर्ज करणार्‍याचं वय 31 जानेवारी पर्यंत 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. इथे पहा अर्ज करण्याची डिरेक्ट लिंक.

अर्ज करण्याची फी

आरक्षण नसलेले, ओबीसी, ईडबल्यूएस उमेदवार 800 रूपये फी आहे तर SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Women/Departmental candidates उमेदवारांना फी माफ असणार आहे.

कसा कराल अर्ज?

  • cbse.gov.in ला भेट द्या.
  • होमपेज वर ‘Latest@CBSE’ सेक्शन मध्ये “Online applications for direct recruitment for the post of Superintendent and Junior Assistant" वर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता टाकून नोंदणी करा.
  • तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा.
  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज डाऊनलोड करा आणि तुमच्या रेकॉर्डसाठी प्रिंट करा.

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 05:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).